---Advertisement---

आयसीसी झाली द्रविडच्या फलंदाजीची दिवानी; शेअर केला अतिशय दुर्मिळ विक्रम

---Advertisement---

मुंबई । भारताचा माजी कर्णधार दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याची जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणती केली जाते. भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या द्रविडचे जगभर चाहते पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी देखील राहुल द्रविडच्या फलंदाजीचे फॅन झाली आहे.

नुकतेच आयसीसीने राहुल द्रविडचा एक दुर्मिळ विक्रम शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. असा विक्रम करणारा राहुल द्रविड जगातला पहिलाच फलंदाज आहे. आयसीसीने त्यांच्या ट्विटर हँडलवर राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम शेअर केला आहे. यापूर्वी असा विक्रम कोणत्याच खेळाडूला करता आला नाही.

आयसीसीने ट्विट लिहिले की,”राहुलने 31,258 कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूंचा सामना केला आहे, जो की क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक जागतिक विक्रम आहे. राहुल शिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत तीस हजारापेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला नाही. त्याने प्रत्येक कसोटी सामन्यात सरासरी 190.6 चेंडूंचा सामना केला आहे.

राहुल द्रविड जागतिक क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने 1994 ते 2012 दरम्यान भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात द्रविडने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याशिवाय आयसीसीने राहुल द्रविडविषयी वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांची प्रतिक्रिया दिली आहे. लाराने द्रविडच्या फलंदाजीचे कौतुक करताना म्हणाला की, “मला आयुष्यभर कोणाची फलंदाजी पाहायला आवडत असेल तर तो खेळाडू राहुल द्रविड असेल.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---