भारताचा कर्णधार एमएस धोनीला भारतीय आर्मीबद्दल मोठा आदर आहे. तसेच अनेकदा त्याच्या कृतीतून हा आदर दिसून येत असतो. नुकतेच आयसीसी 2019च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या पहिल्या सामन्यात धोनीने यष्टीरक्षण करताना इंडियन पॅरा स्पेशल फोर्सचे चिन्ह असलेले ग्लव्हज घातले होते.
पण आयसीसीने बीसीसीआयला विनंती केली आहे की त्यांनी धोनीला त्याच्या ग्लव्हजवरील हे चिन्ह काढायला लावावे.
याबद्दल क्लेर फरलाँग (आयसीसीची व्यवस्थापक, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स) म्हणाल्या, ‘आम्ही बीसीसीआयला धोनीच्या ग्लव्हजवरील चिन्ह काढण्याची विनंती केली आहे.’
धोनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यष्टीरक्षण करताना त्याच्या ग्लव्हवरील बलिदान बॅचने सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या आर्मीप्रेमाचे कौतुकही केले होते.
हा बलिदान बॅच फक्त पॅरा कमांडोला परिधान करण्याची परवानगी आहे. धोनीला 2011 मध्ये भारतीय संरंक्षण दलात लेफ्टनंट कर्नलची सन्माननीय पदवी देण्यात आली आहे. तसेच त्याने 2015मध्ये पॅरा ब्रिगेडच्या अंतर्गत प्रशिक्षणही घेतले आहे. त्यांनंतर त्याला पॅराशूट रेजिमेंटमध्ये सामिल केले गेले. त्यामुळे धोनीला हा बॅच घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
असे असले तरी आयसीसीच्या नियमानुसार ‘आयसीसी साधने आणि कपड्यांच्या नियामानुसार आंतरराष्ट्रीय सामन्यात राजकीय, धार्मिक किंवा जातीय संदेशाचे प्रदर्शन करण्याची परवानगी देत नाही.’ त्यामुळे धोनीला आता हा बलिदान बॅच असलेले ग्लव्हज आंतरराष्ट्रीय सामन्यात घालता येणार नाहीत.
That’s the regimental dagger insignia of the Indian Para Special Forces on Dhoni’s gloves: pic.twitter.com/YKoA5Az54o
— Shiv Aroor (@ShivAroor) June 5, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: शेल्डन कॉट्रेलने बाउंड्री लाईनवर स्टिव्ह स्मिथ घेतला शानदार झेल, पहा व्हिडिओ
–…म्हणून विकेट घेतल्यानंतर सलामी देत सेलिब्रेशन करतो शेल्डन कॉट्रेल
–हिटमॅन रोहित शर्माच्या शतकी खेळीबद्दल कर्णधार कोहली म्हणाला…