संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशामध्ये आता आयसीसीकडे कोणतीही मालिका नाही. त्याचबरोबर त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी अधिक कंटेंटही नाही.
त्यामुळे आयसीसी नव्या युक्त्या लढवत आहे आणि मजेशीर कंटेंट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरून पोस्ट करत आहे. अशा पद्धतीने आयसीसी आपल्या चाहत्यांना व्यस्त ठेवत आहे.
आयसीसीने यादरम्यान आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आयसीसीने अकरा जणांचा स्टे होम संघ तयार केला आहे. यामध्ये २ भारतीय नावांचाही समावेश केला आहे.
Martin 🍵till to open the batting. Sheldon 🐈trell to lead the bowling attack.
Presenting the Stay Home XI 🏠 pic.twitter.com/QwE8Mol26n
— ICC (@ICC) April 3, 2020
या व्हिडिओच्या माध्यमातून आयसीसीने घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली आहे. या यादीसोबत खेळाडूंची नावे जोडली आहेत.
आयसीसीने तयार केलेल्या अकरा जणांच्या स्टे होम संघात पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टीलच्या नावावरून मार्टिन कप्टीलला (Martin Cuptill) ठेवले आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फ्लॉस बटलर (Floss Buttler) आहे. जे जॉस बटलरशी संबंधित आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सुझी प्लेट्स (Suzie Plates) आहे. जे न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सूझी बेट्सशी संबंधित आहे. तर चौथ्या क्रमांकावर हरमनप्रीत कोर (Harmanpreet Core) आहे. हे नाव भारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरशी संबंधित आहे.
पाचव्या क्रमांकावर क्विंटन डी सॉक (Quinton De Sock) आहे. हे नाव दक्षिण आफ्रिकेचा नवीन कर्णधार क्विंटन डी कॉकशी संबंधित आहे. सहाव्या क्रमांकावर थिसारा पर्चिरा (Thisara Perchaira) आहे. जे श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराशी संबंधित आहे.
त्याचबरोबर सातव्या क्रमांकावर वॉशिंग युअर हँड्स सुंदर (WashingYourHands Sundar) आहे जे भारतीय संघाचा युवा फिरकीपटू गोलंदाज वॉशिंगटन सुंदरशी संबंधित आहे. आठव्या क्रमांकावर मेरीझेन टॅप (Marizenne Tap) आहे. तसेच नवव्या क्रमांकावर शाहीन आफ्रिजी (Shaheen Afridgi) आहे. तर दहाव्या क्रमांकावर लॉकी फर्ग्यूसन (Lockey Ferguson) आहे आणि अकराव्या क्रमांकावर शेल्डन कॅटरल (Sheldon Cattrell) आहे.
अशाप्रकारे आयसीसीने खेळाडूंची नावे घरातील आवश्यक असणाऱ्या वस्तूंशी जोडून अकरा जणांचा संघ तयार केला आहे.
असा आहे आयसीसीने तयार केलेला अकरा जणांचा स्टे होम संघ-
मार्टिन कप्टील, फ्लॉस बटलर, सुझी प्लेट्स, हरमनप्रीत कोर, क्विंटन डी सॉक, थिसारा पर्चिरा, वॉशिंग युअर हँड्स सुंदर, मेरीझेन टॅप, शाहीन आफ्रिजी, लॉकी फर्ग्यूसन आणि शेल्डन कॅटरल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-व्यक्ती विशेष- ग्लूसेस्टरचा शेतकरी अॅलेस्टर कूक
–रोहित शर्माने ३ शतकं केलेलं मैदान झालं कोरोना टेस्टचं सेंटर
-क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन