भारतीय महिला क्रिकेट संघाचा उपकर्णधार स्म्रिती मंधाना हिला शुक्रवारी (२६ ऑगस्ट) आयसीसीकडून खास सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने त्यांच्या ‘१००% सुपरस्टार’ या यादीत सहभागी केले आहे. आता ती या यादीत सलामीवीर शेफाली वर्मासोबत सहभागी झाली आहे. स्म्रिती मंधाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये १० वर्ष पूर्ण करेल.
स्म्रिती मंधाना (Smriti Mandhana) आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मागच्या मोठ्या काळापासून तिने स्वतःच्या खेळात सातत्य टिकवून ठेवले आहे. शुक्रवारी आयसीसीने (International Cricket Council) त्यांच्या ‘१००% सुपरस्टार’ या यादीत पाच नवीन खेळाडूंचा समावेश केला. यापैकी एक म्हणजे स्म्रिती. इतर चार खेळाडूंंमध्ये पाकिस्तानची फातिमा शेख, ऑस्ट्रेलियाची एश्ले गार्डनर, इंग्लंडची सोफिया डंकले आणि आयर्लंडची गॅबी लुईस यांचा समावेश केला गेला आहे.
Five incredible women players are featured in the next batch of ICC’s 100% Cricket Superstars ✨
Find out about them ➡️ https://t.co/2snfHFqg86 pic.twitter.com/ZCAaQNClnp
— ICC (@ICC) August 25, 2022
स्म्रिती मंधाना भारतीय महिला संघाची एक महत्वाची खेळाडू आहे. तिने अनेक सामन्यांमध्ये भारताला स्वतःच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे. अनेकदा तिने अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी चाहत्यांसाठी विसरणे अवघड आहे. तिचा चाहता वर्गही इतर कोणत्याही महिला खेळाडूच्या तुलनेत जास्त म्हणावा लागेल. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात.
स्म्रितीच्या कारकिर्दीचा विचार केला, तर तिने एतापर्यंत ७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये तिने पाच शतकांच्या मदतीने आणि ४२.५२ च्या सरासरीने २,८९२ धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये ती आतापर्यंत ९२ सामने खेळली आहे आणि यामध्ये २,१९२ धावा केल्या आहेत. या धावांमध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त स्म्रितीने चार कसोटी सामने देखील खेळले आहेत. यादरम्यान एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने मोलाचे योगदान दिले.
तिच्या खेळातील सासत्या पाहता मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये आयसीसीने तिला ‘महिला क्रिकेटर ऑफ द इयर’ निवडले होते. आयसीसी महिला क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत ती सध्या एकडिवसीय प्रकारात १० व्या, तर टी-२० प्रकारात चौथ्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सरावानंतर विराट भेटला पाकिस्तानच्या फॅनला, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील
दुलीप ट्रॉफीसाठी सज्ज पूर्व विभाग; क्रिडामंत्री कर्णधार तर आयपीएल गाजवणारे साथीदार
अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाची तेलगु योद्धाजवर रोमांचकारी मात