बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान सामना खेळला जात आहे. वनडे विश्वचषक 2023 मधील या अखेरच्या साखळी सामन्यात भारताच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत 410 धावा उभारल्या. मात्र, भारतीय संघ फलंदाजी करत असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. त्यावेळी द्रविड यांची रिएक्शन पाहण्यासारखी होती.
https://www.instagram.com/reel/Czi0xiCvyXy/?igshid=OGZsNmQ4ZTFqZTZv
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सर्वच फलंदाजांनी शानदार फटकेबाजी केली. आघाडीच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके पूर्ण केल्यानंतर श्रेयस अय्यर व केएल राहुल यांनी शतके झळकावली. भारतीय संघ मैदानावर जोरदार फलंदाजी करत असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हिडिओ जायंट स्क्रीनवर दाखवण्यात आला.
द्रविड यांनी 1999 विश्वचषकात केलेल्या फलंदाजीचा हा व्हिडिओ आयसीसीतर्फे मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येत होता. त्यावेळी सर्व चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये देखील भारताच्या खेळाडूंनी व सपोर्ट स्टाफमधील इतर लोकांनी द्रविड यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी द्रविड यांनी सर्वांचे अभिवादन स्वीकार केले.
इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९ वन डे विश्वचषकात राहुल द्रविड सर्वात यशस्वी फलंदाज राहिले होते. त्यांनी आठ सामने खेळताना 85 पेक्षा जास्त सरासरीने 461 धावा केल्या होत्या.
(ICC Shared Rahul Dravid 1999 ODI World Cup Video)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल