आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) बुधवारी (7 जुलै) ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली. फलंदाजांच्या क्रमवारीत ऋतुराज गायकवाडनं 13 स्थानांची मोठी झेप घेत टॉप 10 मध्ये एंट्री केली आहे. तो 662 रेटिंग गुणांसह 7व्या स्थानावर पोहचला आहे. ऋतुराजनं झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 77 धावांची शानदार खेळी खेळली होती. त्यानं 47 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता.
या सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मानंही टी20 क्रमवारीत एंट्री केली आहे. तो 75व्या स्थानी आला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पदापर्णाच्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अभिषेकनं दुसऱ्या टी20 सामन्यात शानदार शतक ठोकलं होतं. याचा त्याला फायदा झाला आहे. या सामन्यात अभिषेकनं 47 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं 100 धावा केल्या होत्या. स्फोटक फिनिशर रिंकू सिंहलाही फायदा झाला आहे. तो 4 स्थानांची झेप घेत 39व्या स्थानी पोहचला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्यानं 22 चेंडूत 48 धावा केल्या होत्या.
फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड 844 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव 821 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. सध्या टॉप 10 क्रमवारीत केवळ 2 भारतीय फलंदाज आहेत.
गोलंदाजांच्या क्रमवारीतही काही बदल झाले आहेत. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी आराम देण्यात आला, ज्यामुळे क्रमवारीत त्यांचं नुकसान झालं आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या 2 सामन्यात 6 बळी घेणारा रवी बिश्नोई 8 स्थानांची झेप घेऊन 14व्या स्थानी पोहचला आहे. इंग्लंडचा आदिल रशिद अव्वल स्थानी कायम आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्याची अव्वल स्थानावरून घसरण झाली आहे. तो गेल्या आठवड्यातच पहिल्या क्रमांकावर पोहचला होता. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगानं हार्दिकची जागा घेतली आहे. हार्दिकचे 213 रेटिंग गुण असून हसरंगाचे 222 गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यर संघात नाही, तर गंभीर कोणाला बनवणार भारताचा टी20 कर्णधार? या खेळाडूचं नाव आघाडीवर
गौतम गंभीर हेड कोच बनला, आता ‘या’ 3 खेळाडूंना संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता नाही
द्रविडने संघाला बनवले टी20 चॅम्पियन, नवे प्रशिक्षक गौतम गंभीरसमोर आता हे 5 मोठे आव्हान