आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने बुधवार, 20 मार्च रोजी टी20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या राशिद खानला 4 स्थानांचा फायदा झाला असून तो आता नवव्या क्रमांकावर आहे. राशिद खान पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर अनेक महिन्यांनी मैदानावर परतलाय. त्यानं आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3 सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्यानं पुन्हा एकदा टॉप-10 गोलंदाजांमध्ये एंट्री केली.
टी-20 मध्ये फलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडियाचा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचं अव्वल स्थान अजूनही कायम आहे. तर इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप-10 फलंदाजीत कोणताही बदल झालेला नाही. सूर्यकुमार यादव गेल्या डिसेबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो कोणताही सामना खेळलेला नाही. सूर्यकुमार व्यतिरिक्त, टॉप-10 मध्ये फक्त यशस्वी जैस्वाल हा भारतीय आहे, जो सध्या सहाव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरला देखील एका स्थानाचा फायदा झाला. तो सध्या आठव्या स्थानावर आहे. तर आदिल रशीदनं पहिलं स्थान कायम राखलं असून श्रीलंकेचा गोलंदाज वानिंदू हसरंगा दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा अक्षर पटेल सध्या चौथ्या आणि रवी बिश्नोई संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अक्षर आणि बिश्नोई व्यतिरिक्त टॉप-20 मध्ये दुसरा कोणताही भारतीय गोलंदाज नाही.
एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीतही काही बदल करण्यात आले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा एका स्थानाची झेप घेत चौथ्या स्थानावर तर श्रीलंकेचा पाथुम निसांका 3 स्थानांनी झेप घेत आठव्या स्थानावर पोहचला आहे. तर एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत, अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनं एका स्थानाची झेप घेत सहावं स्थान पटकावलंय.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बांगलादेशच्या शाकीब अल हसननं अव्वल स्थान कायम राखलं असून, आयर्लंडच्या गॅरेथ डेलानीनं चार स्थानांची झेप घेत 18 वं स्थान पटकवलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : रोहित-हार्दिकमध्ये सर्वकाही ऑल इज वेल! एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
मोहम्मद शमीच्या जागी ‘हा’ गोलंदाज आयपीएलमध्ये खेळणार, मुंबई इंडियन्समध्ये 17 वर्षीय खेळाडूची एंट्री
क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूनं घेतला जगाचा निरोप