भारत विरुद्ध श्रीलंका संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाला 78 धावांनी पराभूत केले आणि मालिका 2-0 अशी खिशात घातली.
या मालिकेनंतर आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्यामुळे तो आता 10 क्रमांकावरुन 9 व्या क्रमांकावर आला आहे.
तसेच गोलंदाजांच्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने 146 स्थानाची झेप घेतली. तो आता 98 व्या क्रमांकावर आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेत 2 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत.
Virat Kohli ➕1️⃣
Eoin Morgan ➕1️⃣The India and England skippers have moved one place up in the @MRFWorldwide ICC T20I Rankings for batting!
Updated rankings: https://t.co/EdMBslOYFe pic.twitter.com/xfkTVgJVxn
— ICC (@ICC) January 11, 2020
विराटव्यतिरिक्त फलंदाजी क्रमवारीत शिखर धवन 15व्या स्थानावर आला आहे. मनीष पांडे 4 स्थानांची प्रगती करत 70व्या स्थानावर पोहचला आहे. तसेच सलामीवीर फलंदाज केएल राहुल 6 व्या क्रमांकावर कायम आहे.
गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. गोलंदाजांमध्ये सैनीव्यतिरिक्त दुखापती मधून पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहला 8 स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता 39व्या स्थानावर आला आहे.
किंग कोहलीचे नाव आता या ६ दिग्गज कर्णधारांच्या यादीत सन्मानाने घेतले जाणार!
वाचा👉https://t.co/sIjbzetQ6R👈#म #मराठी #Cricket #Pune #TeamIndia #INDvSL @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020
अनिल कुंबळे प्रमाणेच जसप्रीत बुमराहने टी२०त केलाय हा मोठा विक्रम!
वाचा👉https://t.co/jG5pxN3lkH👈#म #मराठी #Cricket #Pune #TeamIndia #INDvSL @Jaspritbumrah93
— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020