आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (23 जानेवारी) आपल्या मागील वर्षीच्या आयसीसी पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी गतवर्षीचा सर्वोत्तम टी20 संघ जाहीर केला. या संघात भारताच्या तीन खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे. या संघाचे नेतृत्व टी20 विश्वचषक विजेता कर्णधार इंग्लंडचा जोस बटलर हा करेल.
The ICC Men's T20I Team of the Year 2022 is here ????
Is your favourite player in the XI? #ICCAwards
— ICC (@ICC) January 23, 2023
सोमवारी आयसीसीने गतवर्षातील सर्वोत्तम टी20 संघ घोषित केला. या संघात यावेळी तीन भारतीय खेळाडूंना जागा मिळाली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला सूर्यकुमार यादव, टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा बनवणारा विराट कोहली व भारतीय संघाचे उपकर्णधार अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे प्रथमच एकाच वेळी भारताचे तीन खेळाडू या संघात असतील.
या संघाचे नेतृत्व इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हा करेल. तसेच तो संघाचा सलामीवीर आणि यष्टीरक्षकही असेल. त्याला दुसरा सलामीवीर म्हणून पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान हा साथ देईल. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. या संघात तीन अष्टपैलूंचा समावेश आहे. वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी केलेला झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, भारताचा हार्दिक पंड्या व टी20 विश्वचषकात स्पर्धेचा मानकरी ठरलेला इंग्लंडचा सॅम करन हे अष्टपैलू विभाग सांभाळतील. फिरकीपटू म्हणून श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा हा सलग दुसऱ्या वर्षी आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरला. वेगवान गोलंदाजीची धुरा पाकिस्तानचा हारिस रौफ व आयर्लंडचा जोशुआ लिटल यांच्याकडे देण्यात आली आहे.
आयसीसी 2022 सर्वोत्तम टी20 संघ (पुरुष)-
जोस बटलर (कर्णधार), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, हार्दिक पंड्या, सिकंदर रझा, सॅम करन, वनिंदू हसरंगा, हारिस रौफ व जोशुआ लिटल.
(ICC T20 Team Of The Year 2022 Buttler Lead Suryakumar Virat And Hardik In)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक
क्या बात है! अचानक पुनरागमन करताच जडेजाच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, वाचा सविस्तर






