---Advertisement---

आता एकच लक्ष्य! इंग्लंडला लोळवत टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान गाठणे, पराक्रमासाठी टीम इंडिया सज्ज

On: बुधवार, मार्च 10, 2021 3:22 PM
---Advertisement---

नुकतीच ७ मार्चला न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील टी२० मालिका संपली. या नंतर बुधवारी (१० मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या संघ क्रमवारीनुसार भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत ३-२ अशा फरकाने पराभव स्विकारल्याने त्यांची क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तसेच याचा फायदा भारताला झाला आहे. भारत तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सध्या भारताचे २६८ गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे २६७ गुण आहेत. त्याचबरोबर २७५ गुणांसह इंग्लंड अव्वल क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे १२ मार्चपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे या मालिकेत मोठा विजय मिळवून भारताला क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी असेल. तर इंग्लंड भारताविरुद्ध विजय मिळवत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करु शकतात.

सध्या या क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे पाकिस्तान आणि न्यूझीलंड आहे.

केएल राहुलची एका स्थानाने घसरण

फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा टी२० कर्णधार ऍरॉन फिंच दुसऱ्या क्रमांकावर आल्याने भारताचा फलंदाज केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. फिंचने न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ४९.२५ च्या सरासरीने १९७ धावा केल्या होत्या.

तसेच फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या १० जणांमध्ये राहुल व्यतिरिक्त विराट कोहली असून तो ६ व्या क्रमांकावर कायम आहे. तसेच न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टीलने पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता ८ व्या क्रमांकावर आला आहे. त्याने २१८ धावा ऑस्ट्रेलिया विरुद्ध केल्या होत्या.

https://twitter.com/ICC/status/1369567880019337217

पहिल्या १० गोलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही

गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या ऍश्टन एगारने ४ स्थानांची प्रगती करत चौथे स्थान मिळवले आहे. तसेच न्यूझीलंजचा फिरकीपटू इश सोधी पहिल्या १० जणांमध्ये आला असून आता तो ८ व्या क्रमांकावर आहे. याशिवाय ऍडम झम्पाची एका स्थानाने तर टीम साऊथीची ३ स्थानांनी घसरण झाली आहे.

मात्र, भारताचा एकही गोलंदाज पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. भारतीयांमध्ये वॉशिंग्टन सुंदरची सध्या सर्वोत्तम क्रमवारी असून तो १३ व्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ जसप्रीत बुमराह १८ व्या क्रमांकावर आहे.

https://twitter.com/ICC/status/1369572098172149763

भारत विरुद्ध इंग्लंड संघात १२ मार्चपासून ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेनंतर क्रमवारीत मोठे बदल होऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या –

“माझे वडील ईशांत, अक्षर, सिराजचे…”, वसीम जाफरच्या ‘त्या’ ट्विटवर वॉशिंग्टन सुंदरची भन्नाट प्रतिक्रिया

“एकीकडे पंत फटकेबाजी करत होता, दुसरीकडे बटलर हॉटेलमध्ये आराम..,” इंग्लिश दिग्गजाचा घरचा आहेर

“अक्षरच्या प्रदर्शनानंतर जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---