---Advertisement---

“एकीकडे पंत फटकेबाजी करत होता, दुसरीकडे बटलर हॉटेलमध्ये आराम..,” इंग्लिश दिग्गजाचा घरचा आहेर

On: बुधवार, मार्च 10, 2021 1:30 PM
---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने २२७ धावांनी जिंकला होता. त्यांनतर पुढील तीन सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर अनेक दिग्गज खेळाडूंकडून इंग्लंड संघावर टीका केली जात आहे. अशातच माजी इंग्लिश कर्णधाराने देखील या प्रकरणात उडी घेत इंग्लंड संघावर टीका केली आहे.

ही मालिका दोन्ही ही संघांसाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. या मालिकेत विजय मिळवून इंग्लंड संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी होती. परंतु इंग्लंडने भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावत ही संधी हातून सोडली.

माजी इंग्लिश कर्णधार, नासिर हुसेन यांनी एका वृत्तपत्रातील स्तंभात लिहिले की, “इंग्लंडची सर्वात मोठी अडचण संघ निवड, खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती किंवा रोटेशन पद्धत नाही तर त्यांचे वेळापत्रक आहे. मी ईसीबीसोबत सहमत आहे. मला माहित आहे की ते आपल्या खेळाडूंच्या भल्यासाठी हे सर्व करत होते. परंतु समस्या तेव्हा आली जेव्हा ते खेळाडूंना रोटेट करत होते. मी यापूर्वी देखील म्हणालो होतो की, ही वेळ खेळाडूंना रोटेट करण्याची नाही. खेळाडूंना रोटेट करून इंग्लंडने जिंकण्याची संधी गमावली.”

बटलरला संधी न देण्याबाबत नासिर हुसेन म्हणाले…

इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज जोस बटलर रोटेशन पद्धतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यातून संघाबाहेर होता. याबाबत नासिर हुसेन यांनी लिहिले की, “रिषभ पंत चौथ्या कसोटी सामन्यात मैदानाच्या चारही बाजूला शॉट खेळत होता. दुसरीकडे जोस बटलर इंग्लंड संघाकडून एकमात्र फलंदाज होता, जो अशी कामगिरी करू शकला असता. परंतु त्याला त्याच शहरातील हॉटेलच्या रूममध्ये बसवून ठेवले होते. त्याला येत्या मर्यादित षटकांच्या मालिकेपुर्वीही विश्रांती देण्यात आली आहे. हे मला मुळीच योग्य वाटले नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

“अक्षरच्या प्रदर्शनानंतर जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण”

थाला इज बॅक! विरोधी संघांची उडाली झोप, धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

“विश्वास ठेवा, तो नक्कीच धावा करेल,” खराब फॉर्ममध्ये असलेल्या शुबमनचा भारतीय दिग्गजाकडून बचाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---