आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने (आयसीसी) मंगळवारी (७ सप्टेंबर) महिलांची टी२० रँकिंग घोषित केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फलंदाज शेफाली वर्माने आयसीसी टी२० रँकिंगमध्ये महिला फलंदाजांच्या यादीत प्रथम स्थान कायम राखले आहे. शेफाली ७५९ रेटिंगसह यादित पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेश मूनी (७४४) दुसऱ्या आणि भारतीय महिला टी२० संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना (७१६) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग ७०९ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आणि सोफी डिवाइन एक क्रमांकाने वर सरकत ६८९ रेटिंसह पाचव्या क्रमांकावर आली आहे. फलंदाजांच्या यादीत दक्षिण अफ्रिकाची लिजेल ली तीन क्रमांकांच्या फायद्यासह आठव्या क्रमांकावर पोहचली आहे.
तसेच न्यूझीलँडची सोफी डिवाइन अष्टपैलूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. सोफीने होवमध्ये इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० धावा केल्या असून २६ धावा देत दोन विकेट्सही मिळवल्या होत्या. ती तिच्या या प्रदर्शनाच्या जोरावर अष्टपैलूंच्या यादीत एका क्रमांकाच्या आघाडीसह पहिल्या क्रमांकावर आली आहे. अष्टपैलूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर संयुक्तपणे इंग्लंडची नताली स्किवर आहे.
🔹 Sophie Devine reaches the pinnacle
🔹 Big gains for Lizelle LeeChanges galore in the @MRFWorldwide ICC Women's T20I Player Rankings this week 📈
More details 👉 https://t.co/5JdSlzVZfk pic.twitter.com/cf7EZqQ262
— ICC (@ICC) September 7, 2021
अष्टपैलूंच्या यादीत भारताची दीप्ति शर्मा, ऑस्ट्रेलियाची एलिस पैरी आपापल्या स्थानावर कायम असून वेस्टइंडीजची हेली मैथ्यूज हिने एक क्रमांकाने प्रगती केली आहे. या तिघी अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. वेस्टइंडीजच्या स्टेफनी टेलरला तीन क्रमांकांचे नुकसान झाले असून ती सातव्या क्रमांकावर घसरली आहे.
गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाची मेगान शट दोन क्रमांकानी आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाची जेस योनासेनेही एक क्रमांकाने आघाडी घेत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
भारताची दीप्ति शर्मा सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तसेच पूनम यादव आठव्या क्रमांकावर कायम आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारी हेली मैथ्यूज सात क्रमांकाने आघाडी घेत गोलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम १५ मध्ये पोहचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ओव्हलवरील थरारक विजयानंतर कैफचा जबरदस्त ‘नागिन डान्स’, व्हिडिओवरुन नाही हटणार नजर
क्रिकेटवेड्या पोरापायी गावातील जमीनदार बाप मोहालीत भाड्याच्या घरात राहू लागला!
ओव्हलच्या ऐतिहासिक विजयावर गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया की माजी इंग्लिंग कर्णधाराला लागली मिर्ची