---Advertisement---

“ही पहिली पायरी आहे, आशा आहे की यानंतर तरी भारत आणि पाकिस्तानमधील नातेसंबंध सुधारतील”

On: मंगळवार, मे 18, 2021 2:21 PM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यापूर्वी या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जायची. ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना रंगतदार सामने पाहायला मिळायचे. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या ॲशेस सीरिजपेक्षा काही कमी नसायची. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतर्गत वादांमुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंना भारतात येण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळवण्याबाबत माजी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज दानिश कानेरियाने आपले मत मांडले आहे.

दोन्ही देशातील क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दोन्ही संघांनी २०१२-१३ मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली होती. त्यानंतर हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून आले आहेत. येत्या २०२१ टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हीजा देण्यात आला आहे. याबाबत दानिश कानेरियाने आपले मत व्यक्त केले आहे.

दानिश कानेरियाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “अर्थात ही पहिली पायरी आहे. परंतु यापूर्वी जेव्हा पाकिस्तान संघ २०१६ मध्ये भारतात आला होता. तेव्हाही अशाच गोष्टी सुरू होत्या. आम्हाला आशा आहे की यावेळी गोष्टी चांगल्या आहेत. बीसीसीआयने पाकिस्तानला व्हीजा देण्यासाठी होकार दिला आहे. आम्ही याचा मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “भारत – पाकिस्तान मालिका ही सर्वात मोठी मालिका आहे. मी खूप मालिकादेखील खेळल्या आहेत. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वनडे आणि कसोटी मालिका दोन्ही देशातून बाहेर कुठेतरी आयोजित केली जाऊ शकते. टी -२० विश्वचषकात या दोन संघांची टक्कर होईल. या सामन्यासाठी दोन्हीही देशातील चाहते उत्सुक असतील. दरवर्षी युएई किंवा इंग्लंडमध्ये मालिका खेळली गेली पाहिजे. ज्यात दोन कसोटी, तीन टी -२० सामन्यांचा समावेश असायला हवा. अशा मालिका होणे आवश्यक आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘विसरू नका, विराट-रोहित आयसीसीच्या नॉकआऊटमध्ये फ्लॉप ठरलेत,’ दिग्गजाचे भारतीय संघाच्या मर्मावर बोट

SLvIND: विराटच्या अनुपस्थितीत ‘हे’ खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर करु शकतात फलंदाजी, एकाने केलंय शतक

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय यष्टीरक्षकावर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचे झाले कोरोनाने निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---