आगामी टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) भारतीय संघाची घोषणा केली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विश्वचषकासाठी संघाचा मेंटाॅर (मार्गदर्शक) बनवण्यात आले आहे. मात्र, बीसीसीआयच्या या निर्णयावर आता वाद निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (एमपीसीए) माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयकडे धोनीच्या नियुक्तीबाबत तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये त्यांनी धोनीची नियुक्ती हितसंबंधांचा मुद्दा आहे आणि त्यानुसार एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, असे म्हटले आहे.
एमपीसीएचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या वरिष्ट अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी धोनीची नियुक्ती ही हितसंबंधांच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दोन पदांवर कार्यरत राहू शकत नाही. गुप्त यांनी यापूर्वीही खेळाडू आणि अधिकाऱ्यांविरोधात हितसंबंधाच्या मुद्द्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या आहेत.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी याबाबत चर्चा केली आहे. तो म्हणाला, “होय, गुप्ताने सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांना पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली आणि जय शाह यांचा समावेश आहे. त्यांनी बीसीसीआयच्या संविधानातील कलम ३८ (४) चा हवाला दिला आहे, ज्यानुसार एक व्यक्ती दोन पदांवर काम करू शकत नाही. सर्वोच्च परिषदेला याच्या परिणामांचा तपास घेण्यासाठी त्यांच्या कायदे टीमकडून सल्ला घेण्याची गरज आहे.”
BCCI receives conflict of interest complaint against Dhoni after naming him mentor for T20 WC squad
Read @ANI Story | https://t.co/zFl9eJeycM#Cricket #BCCI pic.twitter.com/DEpqBmwcie
— ANI Digital (@ani_digital) September 9, 2021
अधिकाऱ्याने पुढे सांगितले, “आयपीएलच्या नंतर विश्वचषक खेळला जाणार आहे आणि कोणालाच हे माहित नाही की, धोनी पुढच्या आयपीएल हंगामात खेळेल की नाही. त्यामुळे या तक्रारीमध्ये काही लाॅजिकच नाहीये. तसेच कोणत्या मेंटाॅरची संघ निवड, आदीमध्ये दखल नसते. मेंटाॅरचे काम फक्त सामन्यादरम्यान खेळाडूंना मार्गदर्शन करणे असते.”
दरम्यान, बुधवारी रात्री बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर धोनीला टी२० विश्वचषकासाठी संघाचा मेंटाॅर घोषित केले होते. तो सध्या यूएईमध्ये आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळण्यासाठी त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. अशात आयपीएल २०२२ संदर्भात धोनी काय निर्णय घेईल? यावरुन हा विवाद निवळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, धाकड अष्टपैलू स्टोक्ससह ‘हा’ शिलेदारही बाकावर
रोहिच-पुजाराच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, ‘या’ विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते कसोटी पदार्पणाची संधी
टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, ६ वर्षांनंतर धाकड गोलंदाजाचे पुनरागमन