यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामन्याचा थरार शनिवारी (29 जून) रोजी रंगणार आहे. फायनल सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने असणार आहेत. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत तर एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी बार्बाडोसच्या मैदावरील खेळपट्टी कशी आहे. हे आपण जाणून घेऊया.
बार्बाडोसच्या मैदानावर आतापर्यंत 32 टी20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 19 सामन्यांमध्ये वेळा विजय मिळवला आहे. तर ज्या संघानं प्रथम गोलंदाजी केली तो संघ बार्बाडोसच्या मैदानावर 10 विजय मिळवू शकला आहे आणि या मैदानावर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. प्रथम फलंदाजी करताना या मैदानावरची सरासरी 153 आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषकातील 8 सामने बार्बाडोसच्या मैदानावर खेळले गेले आहेत. त्यामध्ये या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळताना दिसली आहे. तर या मैदानावर भारतानं अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं सोपं नाही. फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 175 पेक्षा जास्त धावा ठोकल्या तर ते विजयी लक्ष ठरु शकतं.
दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकाॅर्ड
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका 26 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारतानं 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्ध 11 सामने जिंकले आहेत. तर 14 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं पारडं जड आहे.
त्यामध्ये टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संंघ 6 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिका 2 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी राहिला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि टी20 विश्वचषकात भारताचं वर्चस्व राहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDW vs RSAW कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतानं ठोकल्या 525 धावा
सामन्यानंतर रोहित शर्मानं दिला पत्नी रितिका सजदेहला फ्लाइंग किस, पहा व्हिडिओ
शफाली वर्मानं रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलं वेगवान द्विशतक