---Advertisement---

IND vs RSA सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर ट्राॅफी कुणाची?

On: शनिवार, जून 29, 2024 5:13 PM
IND vs RSA (1)
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी चर्चा सुरु आहेत की जर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुपर ओव्हरमध्ये टाय झाला तर ट्राॅफी कुणाची? या बातमीद्वारे आपण सविस्तर जाणून घेऊया.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या फायनल सामन्यात जर रोमांच पाहायला मिळाला आणि जर हा सुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाला तर ट्राॅफी कुणाची असणार? सुपर ओव्हर खेळून सुद्धा सामना बरोबरीवर येवून राहिला तर तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे जोपर्यंत दोन्हीतला एक संंघ सामना जिंकत नाही. सुपर ओव्हरमध्ये बाउंड्रीच्या काउंटवर कोणत्याही संघाला विजयी घोषित केले जाणार नाही.

2019च्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ फायनलमध्ये पोहोचले होते. त्यावेळी हा सामना टाय झाला होता. सुपर ओव्हर खेळूनही हा सामना टाय झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दोन्हीही संघाच्या 15-15 धावा झाल्या आणि इंग्लंडला या सामन्याचा विजयी संघ घोषित करण्यात आले. कारण त्यांनी बाउंड्री जास्त मारल्या होत्या परंतू आता तो नियम नाही. त्यामुळे जरी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टाय झाला तरी जोपर्यंत संघ जिंकत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आता वर्ल्डकप आपलाच…!!! ‘पनौती’ म्हणून ओळख असलेल्या सेलिब्रेटीचा दक्षिण आफ्रिकेला सपोर्ट
…तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची फायनल ठरू शकते विराट कोहलीच्या टी20 करिअरची अखेरची मॅच!
“काहीही झालं तरी विजय…” फायनलपूर्वी आफ्रिकेचा कर्णधार मार्करमनं दिला टीम इंडियाला इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---