---Advertisement---

फायनल सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं! जाणून घ्या दोन्ही संघाच्या प्लेइंग 11

ind vs sa
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना आज (29 जून) रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 8:00 वाजता खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या सामन्यासाठी सज्ज असणार आहेत. भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तर दक्षिण आफ्रिका एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी भारतानं टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका 26 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारतानं 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्ध 11 सामने जिंकले आहेत. तर 14 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं पारडं जड आहे.

त्यामध्ये टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संंघ 6 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिका 2 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी राहिला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि टी20 विश्वचषकात भारताचं वर्चस्व राहिलं आहे.

या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं चमकदार कामगिरी केली आहे. भारतानं या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावला नाही. भारतानं 7 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेनं या विश्वचषक स्पर्धेत 8 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिका टी20 विश्वचषक स्पर्धेत सलग 8 सामने जिंकणारा एकमेव संघ आहे. याआधी आफ्रिका संघ कधीही आयसीसीच्या स्पर्धेमध्ये फायनल सामना खेळण्यासाठी पात्र ठरला नव्हता परंतू या विश्वचषकात त्यांनी धमाकेदार कामगिरी करत फायनलसाठी तिकीट पक्कं केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

फायनल जिंकताच रोहित शर्मा रचेल इतिहास, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला कर्णधार
रोहित-रबाडापासून, विराट-यानसेनपर्यंत, फायनलमध्ये या खेळाडूंमध्ये पहायला मिळेल जंगी लढत
टी20 विश्वचषकाची ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर रोहित शर्माला संघात स्थान, कर्णधार मात्र दुसराच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---