यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 25वा सामना आज (12 जून) रोजी भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जात आहे. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. तर आज अमेरिकेची धुरा आरोन जोन्स (Aaron Jones) सांभाळताना दिसत आहे. अमेरिकेनं भारताला जिंकण्यासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
भारतानं टाॅस जिंकून अमेरिकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात अमेरिकेन 8 गडी गमावून 110 धावा केल्या. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गोलंदाजांना जास्त मदत मिळत असल्या कारणानं या मैदानावर जास्त धावा पाहायला मिळत नाहीत. अमेरिकेसाठी नितीश कुमारनं (Nitish Kumar) 23 चेंडूत सर्वाधिक 27 धावा केल्या. तर सलामीवीर स्टीव्हन टेलरनं (Steven Taylor) 30 चेंडूत 24 धावा ठोकल्या.
भारतासाठी प्रतिभावान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) 4 विकेट्स त्याच्या नावी केल्या. हार्दिक (Hardik Pandya) पांड्यानं 2 तर अक्षर पटेलनं (Axar Patel) 1 विकेट घेतली. त्यामुळे अमेरिका संघ 8 विकेट्स गमावून केवळ 110 धावा करु शकला. आता अमेरिकेच्या या खेळपट्टीवर भारतीय संघ कशाप्रकारे धावांचा पाठलाग करतो, हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
अमेरिका- स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिस गॉस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान
महत्त्वाच्या बातम्या-
नाद करा, पण विराटचा कुठं! आफ्रिदीचा विक्रम मोडला, आता नंबर धोनीचा
बाबर आझमने आयसीसी टी20 क्रमवारीत घेतले झेप, संघाची कामगिरी मात्र खराबच
भारतानं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11