यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 1 सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान (RSA vs AFG) यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. एकदिवसीय किंवा टी20, दक्षिण आफ्रिका संघ सेमीफायनलच्या पुढे कधीच गेला नव्हता.
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं सलग 8 सामने जिंकले आहेत. टी20 विश्वचषकात याआधी कोणत्याही संघानं 8 सामने जिंकले नाहीत. त्यानंतर भारतानं या विश्वचषक स्पर्धेत सलग 6 विजय मिळवले आहेत. परंतू दक्षिण आफ्रिकेनं कधीही सलग 8 सामने जिंकले नव्हते. परंतू आता एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली त्यांनी टी20 विश्वचषकात सलग आठ सामने जिंकून इतिहास रचला आहे.
तत्पूर्वी या सामन्यात अफगाणिस्ताननं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू त्यांच्यासाठी तो उत्तम ठरला नाही. अफगाणिस्ताननं 11.5 षटकात सर्वबाद केवळ 56 धावा ठोकल्या. तर आफ्रिकेसाठी वेगवान गोलंदाज मार्को जेन्सान आणि फिरकीपटू तबरेझ शम्सी यांनी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर रबाडा आणि नाॅर्टजे यांनी 2-2 विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
57 धावांचं लक्ष्य असलेल्या दक्षिण आफ्रिकेनं 9 गडी राखून 8.5 षटकात विजय मिळवला. आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी काॅक 5 धावांवरती बाद झाला. त्यानंतर रिझा हेंड्रीक्स आणि कर्णधार एडन मार्करम यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाचा मोर्चा सांभाळत आफ्रिकेला सामना जिंकून दिला. त्यामध्ये रिझा हेंड्रीक्स 29 आणि एडन मार्करमनं 23 धावांची खेळी खेळली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं सावट! मॅचपूर्वी पाहा उपांत्य फेरीचे संपूर्ण गणित
श्रीलंकेला धक्का! जयवर्धनेच्या पाठोपाठ हेड कोच ख्रिस सिल्व्हरवुडनी दिला राजीनामा
रडारड सुरू! भारत सेमीफायनलमध्ये गेल्यामुळे वाढली इंग्लंडच्या खेळाडूची पोटदुखी, म्हणाला….