यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 2 सामना आज (27) जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs England) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना रंगणार आहे. भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma) तर इंग्लंड संघ जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी जोस बटलरनं टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
इंग्लंड- फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले
शेवटच्या टी20 विश्वचषकात जेव्हा भारत आणि इंग्लंड सेमीफायनल 2 मध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी इंग्लंडनं भारताचा 10 गडी राखून धुव्वा उडवला होता. त्या सामन्यात कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) तुफानी खेळी खेळली होती. परंतू यंदाच्या टी20 विश्वचषकात इंग्लंडपेक्षा भारताची कामगिरी चमकदार राहिली आहे. भारतानं या विश्वचषकात अद्याप एकही सामना गमावला नाही.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 23 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारताचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 12 सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर इंग्लंडनं 11 सामने जिंकले आहेत. परंतू आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) इतिहासात भारत आणि इंग्लंड 4 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टी20 विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी समान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“खराब खेळपट्टीमुळे सामना हारलो…” अफगाणिस्तानच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ‘या’ भारतीय खेळाडूला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी…!
बीसीसीआयचा मोठा निर्णय! तुषार-मयंकसह हे 7 वेगवान गोलंदाज झाले मालामाल