यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सुपर 8 मधील तिसरा सामना गुरुवारी (20 जून) रोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं अफगाणिस्तानसमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
भारतानं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतासाठी सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) 28 चेंडूत सर्वाधिक 53 धावांची आक्रमक खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 5 चौकारांसह 3 उत्तुंग षटकार ठोकले. तर हार्दिक पांड्यानं 32 धावांच्या खेळीत 2 षटकार ठोकले. रिषभ पंत (Rishabh Pant) 20, विराट कोहली (Virat Kohli) 24 धावा यांच्या जोरावर भारतानं 7 गडी गमावून 181 धावांचं लक्ष्य गाठलं.
अफगाणिस्तानसाठी प्रतिभावान वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीनं (Fazalhaq Farooqi) 3 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार फिरकीपटू राशिद खाननं (Rashid Khan) 3 विकेट्स घेतल्या आणि वेगवान गोलंदाज नवीन उल हकच्या (Navin Ul Haq) हाती 1 विकेट लागली.
अफगाणिस्तान 182 धावांचा लक्ष्य गाठू शकेल का? हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भारतासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) उत्कृष्ट फाॅर्ममध्ये गोलंदाजी करत आहे. भारतानं आजच्या सामन्यात एक अतिरीक्त फिरकीपटू कुलदीव यादवचा (Kuldeep Yadav) समावेश केला आहे. त्यामुळे भारताची गोलंदाजी अधिक मजबूत आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह
अफगाणिस्तान- रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झादरन, हजरतुल्ला झझई, गुलबदिन नाईब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर 8 सामन्यात भारतानं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
हॉकी पुणे लीगला आजपासून होणार सुरुवात, कनिष्ठ व वरिष्ठ गटांमध्ये १८ संघांमध्ये चुरस
महागडी ऑडी कार आली कुठून? पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप!