---Advertisement---

भारत-वेस्ट इंडिज सामन्यात पडणार पाऊस? जाणून घ्या कोलकाताचे हवामान आणि पिच रिपोर्ट

On: रविवार, मार्च 1, 2026 2:42 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (१ मार्च) कोलकातामध्ये सामना खेळला जाणार आहे. आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधील हा सुपर-८चा सामना ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना म्हणजे एक प्रकारची बाद फेरी असणार आहे, कारण जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत आणि हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार आहे. यामुळे सामन्याआधी कोलकाताच्या हवामानाचा रिपोर्ट जाणून घेऊ.

कोलकातामध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. मागील आठवड्यात कोलकातामध्ये पाऊल झाला होता, त्यामुळे आज कसे वातावरण असेल याची चिंता होती. आज रात्री किंवा दिवसा पाऊस पडण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून आकाश स्वच्छ असणार आहे. नाणेफेकीवेळी तापमान २७ डिग्री सेल्सियस असणार आहे. थोडीफार हवा असल्याने गोलंदाजांसाठीही अनुकूल आहे. कारण स्विंग मिळण्याची शक्यता आहे. रात्री उशिराही पावसाची शक्यता नसल्याने चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे. येथे या स्पर्धेचे ५ सामने खेळले गेले, त्यामध्ये सरासरी रनरेट ८.५९ राहिला. यामुळे सामना मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे, मात्र ते सर्व सामने दिवसा झाले होते. येथे वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूने फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र स्पिनर्सला अधिक टर्न मिळणार नाही. तसेच रात्री खेळला जाणारा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. यामुळे चाहत्यांना चकित करणारा निकालही पाहायला मिळू शकतो.

समजा, सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना एक-एक गुण मिळेल. अशा स्थितीत वेस्ट इंडिज उत्तम नेट रनरेटच्या आधारे उपांत्य फेरीत पोहचेल.

कोलकातामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात ४ टी२० सामने खेळले गेले. ते चारही सामने भारताने जिंकले आहेत. विश्वचषकात मात्र वेस्ट इंडिज भारताच्या वरचढ ठरला आहे. टी२० विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये वेस्ट इंडिजने ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---