---Advertisement---

सुपर-8 मध्ये भारतासमोर सिंकदर रझाचे आव्हान! ‘हा’ इतिहास रचण्यापासून केवळ 15 धावा दूर, होणार रोहित-विराटच्या यादीत एंट्री

On: गुरूवार, फेब्रुवारी 26, 2026 2:57 PM
Sikandar Raza
---Advertisement---

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (२६ फेब्रुवारी) सायंकाळी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुपर-८चा सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळला जाणार असून दोन्ही संघांना महत्वाचा आहे. हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नाच दोन्ही संघ असणार आहे. या सामन्यात भारतासाठी झिम्बाब्वेचा कर्णधार सिंदकर रझाचे आव्हान असणार आहे.

नुकतेच रझाचे आंतरराष्ट्रीय टी२० अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. तसेच त्याने संघाला सुपर-८मध्ये पोहोचण्यात मोठी भुमिका पार पाडली आहे. त्याच्याकडे भारताविरुद्ध खास कामगिरी करण्याची संधी आहे. त्याला आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३००० धावा पूर्ण करण्यासाठी १५ धावांची आवश्यकता आहे. हे करताच तो क्षण झिम्बाब्वेसाठी ऐतिहासिक ठरेल.

रझाचे १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून तो आता ३००० धावा पूर्ण करण्याच्या जवळ आला आहे. त्याने यामध्ये एक शतक आणि १६ अर्धशतके केली आहेत. तो मधल्या फळीत धावा काढताना स्थिरता आणत वेगही वाढवतो. यामुळे त्याचा हा अनुभव भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

भारताविरुद्ध १५ धावा काढताच रझाचा समावेश विराट कोहली, रोहित शर्मा, बाबर आझम आणि जोस बटलर यांच्या यादीत होईल. तसेच त्याने १०३ विकेट्सही घेण्याची कामगिरी केली आहे.

दोन्ही संघांसाठी हा ‘करो वा मरो’ सामना आहे, कारण दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सामने गमावले आहेत. भारताला दक्षिण आफ्रिकेने आणि झिम्बाब्वेला वेस्ट इंडिजने मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या नेट रनरेटवर त्याचा परिणाम झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---