---Advertisement---

T20 WC 2026: बांगलादेशनंतर पाकिस्तानही बाहेर? टी20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा ट्विस्ट

On: गुरूवार, जानेवारी 22, 2026 5:24 PM
---Advertisement---

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यासाठी आता केवळ 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र स्पर्धेपूर्वीच काही मोठे वाद निर्माण झाले असून ते अजूनही पूर्णपणे सुटलेले नाहीत. दीर्घ चर्चा आणि बैठकीनंतर आयसीसीने बांगलादेशचा मुद्दा जवळपास मार्गी लावला असून त्याचा अधिकृत निर्णय कधीही जाहीर होऊ शकतो. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न पाकिस्तानबाबत निर्माण झाला आहे.

आयसीसीने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, बांगलादेश क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कपचे सामने खेळण्यासाठी भारतात यावेच लागेल. जर बांगलादेशने भारतात येण्यास नकार दिला, तर त्यांना थेट स्पर्धेतून बाहेर काढण्यात येईल. एवढेच नाही, तर बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाला नव्याने प्रवेश दिला जाईल, हेही निश्चित झाले आहे.

आयसीसीकडून मिळालेल्या एक दिवसाच्या अल्टीमेटमनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डात (BCB) मोठी खळबळ उडाली आहे. आज गुरुवार संध्याकाळपर्यंत बीसीबीला अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. आता बांगलादेशसमोर दोनच पर्याय उरले आहेत. भारतामध्ये येऊन सामने खेळणे किंवा टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणे.

दरम्यान, पाकिस्तानचा मुद्दा अजूनही अनिश्चित आहे. याआधी पाकिस्तानकडून असे संकेत देण्यात आले होते की, जर बांगलादेशने स्पर्धेचा बहिष्कार केला, तर पाकिस्तानही तसेच करेल. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) टी20 वर्ल्ड कपसाठी अजूनही आपल्या संघाची अधिकृत घोषणा केलेली नाही.

टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे, ज्यातील पहिला सामना 29 जानेवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेसाठीही पाकिस्तान संघाची घोषणा झालेली नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेलाच संघ वर्ल्ड कपमध्येही उतरेल. मात्र विलंबामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी सरावही थांबवल्याची चर्चा आहे, ज्यामुळे बहिष्काराच्या शक्यतेला बळ मिळत आहे.

आता बांगलादेशचा अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानची पुढील भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---