संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जूनपर्यंत सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकावरही या व्हायरसचे सावट पसरताना दिसत आहे. या स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. परंतु या व्हायरसमुळे आयसीसीला विश्वचषकाबाबत कोणताही निर्णय लवकर घ्यायचा नाही.
आयसीसी विश्वचषकाबाबत ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ शकते. जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर, हा टी२० विश्वचषक एक वर्षासाठी स्थगित करण्यात येऊ शकतो किंवा प्रेक्षकांशिवायही आयोजित केला जाऊ शकतो.
एका वृत्तानुसार, कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संकटामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात महत्त्वाची मालिका खेळण्यात येणार आहे. या विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया (Australia vs India) दौऱ्यात ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिकादेखील खेळणार आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, आयसीसी (ICC) ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विश्वचषकावर निर्णय घेणार आहे. सध्या काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. आयसीसीसाठी लोकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. काही दिवसांमध्ये परिस्थिती खूप खराब झाली आहे. तसेच आयसीसीसाठीही विश्वचषकावर निर्णय घेणे कठीण होत आहे. सध्या आपल्याला आयसीसीच्या निर्णयापूर्वीच कोणताही अंदाज लावला येणार नाही.
“सर्वकाही एका नियोजनाप्रमाणे करण्यात येईल. सर्वांचा असा प्रयत्न आहे की, विश्वचषक आपल्या नियोजित वेळेत पार पडावा. त्यासाठी आयसीसीची स्थानिक संघटना समितीने (Local Organisation Committee) ऑस्ट्रेलियामध्ये आपली सर्व तयारी करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थितीत सुधारणा झाली तर सर्वकाही ठीक होईल,” असे सूत्राने यावेळी सांगितले.
आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या कठीण काळात आमची प्राथमिकता ही खेळाडू, सर्व प्रशिक्षक, अधिकारी, चाहते आणि संपूर्ण क्रिकेटशी संबंधित सर्वांची सुरक्षा आहे. विश्वचषकासाठी जी काही तयारी केली जात आहे, त्यामध्ये सर्वांची सुरक्षा लक्षात घेतली आहे.”
वेस्ट इंडीज संघाने २०१६मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला ४ विकेट्सने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. दर २ वर्षांनी होणारा हा विश्वचषक २०१८मध्ये आयसीसीने स्थगित केला होता. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी २०१७मध्ये सांगितले होते की, या मोसमात अनेक देशांमध्ये मालिका खेळण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेच्या समस्येमुळे ही स्पर्धा २०२०पर्यंत स्थगित करण्यात येत आहे.
आयसीसीने सांगितले होते की, “या दिवसांमध्ये आयसीसीच्या अनेक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे टी२० क्रिकेटला कंटाळवाणे करायचे नाही. यापूर्वी २००७मध्ये सुरु झालेल्या या विश्वचषकाचे आयोजन हे २०११ वनडे विश्वचषकामुळे एक वर्षापूर्वी करण्यात आले होते.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-शेवटच्या १० ओव्हरमध्ये धु- धु धुणारे जगातील ५ क्रिकेटपटू
-अखेर क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा असलेला हा दौरा झाला रद्द
-आणि फ्लिटाॅफ युवराजला म्हणाला, बाहेर भेट; मी तुझा गळाच कापतो