आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप १ ऑगस्ट २०१९ रोजी अॅशेस मालिकेपासून सुरू झाली. जून २०२१ पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेत ९ संघानी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर क्रमवारीतील अव्वल दोन संघांदरम्यान होईल.
सर्व संघांना या चॅम्पियनशिपमध्ये ६-६ मालिका खेळायच्या आहेत आणि प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण आहेत. कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची आत्तापर्यंतची कामगिरी जबरदस्त आहे. भारतीय संघ गुणतालिकेत ३६० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
आता आपण आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणाऱ्या पहिल्या १० खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
सर्वाधिक धावा करणारे १० फलंदाज
१. मार्नस लॅब्युशेन (ऑस्ट्रेलिया) – (९ सामने- १२४९ धावा, ८३.२६ सरासरी, ४ शतके)
२. बेन स्टोक्स (इंग्लंड) – (१३ सामने ११३१ धावा ५३.८५ सरासरी, ४ शतके)
३. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – (९ सामने १०२८ धावा, ७३.४२ सरासरी, ३ शतके)
४. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – (१० सामने ८८१ धावा, ५५.०६ सरासरी, ३ शतके)
५. जो रूट (इंग्लंड) – (१२ सामने ८२८ धावा, ३७.६३ सरासरी, ० शतके)
६. मयंक अग्रवाल (भारत) – (९ सामने ७७९ धावा, ५५.६४ सरासरी – ३ शतके)
७. रोरी बर्न्स (इंग्लंड) – (१० सामने ७३१ धावा, ३८.४७ सरासरी, १ शतक)
८. अजिंक्य रहाणे (भारत) – (९ सामने ७१५ धावा, ५९.५८ सरासरी, २ शतके)
९. बाबर आझम (पाकिस्तान) – (६ सामने ६८९ धावा, ८६.१२ सरासरी, ३ शतके)
१०. विराट कोहली (भारत) – (९ सामने- ६२७ धावा, ५२.२५ सरासरी, २ शतके)
सर्वाधिक विकेट्स घेणारे १० गोलंदाज
१. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – (१२ सामने ५९ विकेट्स, १९.५० सरासरी, ५ विकेट्स- २ वेळा आणि १० विकेट्स- १ वेळा)
२. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – (१० सामने ४९ विकेट्स, २१.४४ सरासरी, ५ विकेट्स- १ वेळा)
३. नॅथन लियोन (ऑस्ट्रेलिया) – (१० सामने ४७ विकेट्स, २६.८२ सरासरी, ५ विकेट्स- ४ वेळा आणि १० विकेट्स- १ वेळा)
४. मोहम्मद शमी (भारत) – (९ सामने ३६ विकेट्स, १८.३६ सरासरी, ५ विकेट्स- १ वेळा)
५. जोफ्रा आर्चर (इंग्लंड) – (८ सामने ३६ विकेट्स, २५.०२ सरासरी, ५ विकेट्स- ३ वेळा)
६. टिम साउदी (न्यूझीलंड) – (६ सामने ३३ विकेट्स, १८.८१ सरासरी, ५ विकेट्स- २ वेळा)
७. मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – (६ सामने ३३ विकेट्स, १९.१५ सरासरी, ५ विकेट्स- २ वेळा)
८. जोश हेजलवुड (ऑस्ट्रेलिया) – (७ सामने ३१ विकेट्स, २१.१९ सरासरी, ५ विकेट्स- १ वेळा)
९. इशांत शर्मा (भारत) – (७ सामने ३० विकेट्स, १५.५० सरासरी, ५ विकेट्स- ३ वेळा)
१०. बेन स्टोक्स (इंग्लंड) – (१३ सामने २९ विकेट्स, २५.५१ सरासरी, ५ विकेट्स- ०)
ही क्रमवारी दि. ९ ऑगस्ट २०२० पर्यंतची आहे
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज