इंग्लंडच्या संघाने नुकतेच पाकिस्तानच्या दौऱ्यात सात सामन्यांची टी20 मालिका 4-3 अशा फरकाने जिंकली आहे. या दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका टी20 विश्वचषकानंतर खेळली जाणार आहे. यासाठी इंग्लंड पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. या दौऱ्यातून इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज बाहेर झाला आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. याचे कारण पुढे आले आहे. स्टुअर्टची पत्नी मौली किंग ही नोव्हेंबरमध्ये पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तर इंग्लंड डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यामुळे ब्रॉडला पाकिस्तानला जाणे जवळपास अशक्य दिसत आहे.
ब्रॉड हा इंग्लंडकडून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. इंग्लंड संघ तब्बल 17 वर्षानंतर कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघ तीन कसोटी सामने खेळणार आहेत.
या मालिकेतील पहिला सामना एक डिसेंबरला रावळपिंडी, दुसरा सामना 9 डिसेंबर मुलतान आणि तिसरा सामना 17 डिसेंबर कराची येथे खेळला जाणार आहे. ही कसोटी मालिका टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतर्गत आहे. द मेलच्या रिपोर्टनुसार, ज्या दिवशी अबूधाबीमध्ये सरावाचा कॅम्प सुरू होणार आहे, त्याच्या जवळपास ब्रॉडच्या पहिल्या बाळाचा जन्म होण्याची शक्यता आहे. अभ्यास सामना इंग्लंड विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात खेळला जाणार आहे.
ब्रॉडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 336 सामने खेळताना 809 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये त्याने 159 कसोटी सामने खेळताना 293 डावांमध्ये 27.8च्या सरासरीने 566 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 121 वनडे सामन्यात 178 विकेट्स आणि 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 65 विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रॉड आणि जेम्स ऍंडरसन ही जोडी इंग्लंडच्या ताफ्यात असली की विरोधी संघाची दाणादाण उडते. आता पाकिस्तानच्या दौऱ्यात एक गोलंदाज खेळणार नसल्याने इंग्लंडवर त्याचा काय परिणाम होईल हे मालिका सुरू झाल्यावर कळेलच.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अजून तर खूप खेळणार आहे…’, टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर शार्दुल ठाकुर नाराज
बाबरकडून टीकाकारांची बोलती बंद, न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक ठोकत विराट-रोहितच्या विक्रमाशी केली बरोबरी
सिराजच्या वेगापुढे डी कॉकने टेकले गुडघे, पापणी लवण्याच्या आतच उडवल्या दांड्या; व्हिडिओ पाहाच