---Advertisement---

इंग्लंडची कसोटी चॅम्पियनशिपच्या पाँइंट टेबलमध्ये मोठी झेप; जाणून घ्या किती आहेत गुण

On: मंगळवार, जुलै 21, 2020 5:29 PM
---Advertisement---

काल(२० जुलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात मँचेस्टर येथे दुसरा कसोटी सामना पार पडला.  या सामन्यात इंग्लंडने ११३ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ही मालिका मागीलवर्षी सुरु झालेल्या कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. त्यामुळे इंग्लंडच्या या विजयाबरोबरच आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही बदल झाला आहे. 

इंग्लंडने मँचेस्टर कसोटी जिंकली असल्याने त्यांना ४० गुण मिळाले आहेत. त्यामुळे आता त्यांचे १८६ गुण झाले आहेत. या गुणांसह त्यांनी गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे. न्यूझीलंड आता चौथ्या क्रमांकावर आली असून त्यांचे १८० गुण आहेत.

इंग्लंडची ही कसोटी चॅम्पियनशिपमधील तिसरी कसोटी मालिका असून त्यांनी आत्तापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यातील ६ सामने त्यांनी जिंकले आहेत, तर ४ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच १ सामना अनिर्णित राहिला आहे.

मात्र वेस्ट इंडिजला पराभव स्विकारावा लागल्याने एकही गुण मिळालेला नाही. त्यांनी इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकून ४० गुण मिळवले होते. पण दुसरा कसोटी सामन्यात ते पराभूत झाले. त्यामुळे सध्या वेस्ट इंडिज संघ या गुणतालिकेत ४० गुणांसह ७ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजसाठी ही कसोटी चॅम्पियशिपमधील दुसरीच मालिका आहे. त्यांनी आत्तापर्यंत ४ कसोटी सामने खेळले असून यात १ विजय आणि ३ पराभव स्विकारले आहेत.

सध्या कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघ आहे. त्यांचे ९ सामन्यांपैकी ७ विजयांसह ३६० गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांचे १० सामन्यात २९६ गुण आहेत.

तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका अनुक्रमे १४० गुण आणि ८० गुणांसह पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहे. तर आठव्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे २४ गुण आहेत आणि शेवटच्या क्रमांकावर बांगलादेश असून त्यांनी अजून गुणांचे खाते उघडलेले नाही.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर कसोटी चॅम्पियनशिपची गुणतालिका –

Screengrab: icc-cricket.com

असे दिले जातात कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण – 

ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात होत आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.

तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असतील.

या चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.

पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर सामन्यात बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही.

जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.

या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील त्या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडेल.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये असे मिळणार गुण – 

Screengrab: icc-cricket.com

सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक संघांच्या कसोटी मालिका स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे कसोटी चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो.

ट्रेंडिंग घडामोडी – 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजा- पंड्याचे खेळणे कठीण, पहा कोण म्हणतंय

गोलंदाजी करत असताना अचानक बेन स्टोक्स सीमारेषेकडे धावला आणि…

३० वेळा आठवण करुन देऊनही मुंबई क्रिकेट असो. पोलीसांचे पैसे काही देईना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---