---Advertisement---

पहिल्या ऍशेस विजयानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत मोठी झेप; भारताला मात्र नुकसान

On: शनिवार, डिसेंबर 11, 2021 5:03 PM
Australia
---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs England) संघात सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील (Ashes Series) पहिला सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्स राखून जिंकला. यानंतर आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship) गुणतालिकेत मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाने या विजयानंतर गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला या विजयामुळे १२ गुण मिळाले आहेत आणि गुणतालिकेत त्यांनी भारताला मागे टाकले आहे.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर मिळवलेल्या पहिल्या ऍशेस सामन्यात विजय मिळवल्यानंतर जागतिकत अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाने घेतलेलेल्या या आघडीनंतर भारताला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघ या गुणतालिकेत सध्या एका स्थानाने खाली घसरला असून ४२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आला आहे.

त्याचसोबत पाकिस्तानवर देखील एका स्थानाने खाली घसरण्याची वेळ आली. पाकिस्तान सध्या ३६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका संघ मात्र त्यांच्या पहिल्या स्थानावर कायम आहे. गुणतालिकेतील संघांची क्रमवारी विजयाच्या टक्केवारीनुसार ठरवण्यात येते. 

भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताची या स्पर्धेतील जिंकण्याची सरासरी ५८.३३ टक्के आहे, तर पाकिस्तानची जिंकण्याची सरासरी ७५ टक्के आहे. त्यामुळे भारताकडे गुणतालिकेत सर्वाधिक गुण असले, तरी संघ चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांची जिंकण्याची सरासरी १०० टक्के असून हे संघ गुणतालिकेक अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एक कसोटी सामना खेळला आहे आणि तो जिंकला आहे. तसेच श्रीलंकेने आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. वेस्ट इंडीजची जिंकण्याची सरासरी २५ टक्के आहे, तर इंग्लंड संघ १४ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडने अजिंक्यपद स्पर्धेच्या या हंगामनात खेळलेल्या चार कसोटी सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे.

https://twitter.com/ICC/status/1469516718473191429

दरम्यान, ऍशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसापासून इंग्लंडवर वर्चस्व निर्माण केले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला अवघ्या १४७ धावांमध्ये सर्वबाद केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४२५ धावांचा मोठा डोंगर उभा केला, यामध्ये ट्रॅविस हेडने सर्वाधिक १५२ धावा केल्या.

त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ २९४ धावा करून सर्वबाद झाला. इंग्लंड संघ दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियावर अवघ्या २० धावांची आघाडी घेऊ शकला आणि ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य फक्त ५.१ षटकात गाठले.

महत्वाच्या बातम्या –

तब्बल ३३ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणालाच जमला नाही, तो पराक्रम केवळ टीम इंडियाने करुन दाखवलाय

पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड चारीमुंड्या चीत! यजमानांचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

मलानची विकेट घेताच लायनची ३ मोठ्या विक्रमांना गवसणी; अश्विन, मुरलीधरनच्या पंक्तीत स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---