---Advertisement---

संपूर्ण यादी – आयसीसीकडून सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून सन्मानित झालेले क्रिकेटपटू

On: बुधवार, जानेवारी 15, 2020 5:17 PM
---Advertisement---

आज(15 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2019 वर्षांचे पुरस्कार घोषित केले आहेत. या पुरस्करांमधील वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला मिळाला आहे.

2004पासून सुरु झालेला हा पुरस्कार मिळवणारा कमिन्स हा एकूण 15 वा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच सर्वोत्तम कसोटीपटूचा हा पुरस्कार मिळवणारा तो ऑस्ट्रेलियाचा 5 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क, मिशेल जॉन्सन आणि स्टिव्ह स्मिथ यांना आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. यातील स्मिथने 2 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. अन्य सर्वांना प्रत्येकी 1 वेळा हा पुरस्कार मिळवता आला आहे.

कमिन्स 2019 या वर्षातील कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 12 कसोटी सामन्यात 20.13 च्या सरासरीने 59 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच या वर्षात त्याने 2 वेळा एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे.

कमिन्सच्या आधी आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार 14 क्रिकेटपटूंनी मिळवला आहे. या क्रिकेटपटूंची ही यादी –

आयसीसी सर्वोत्तम कसोटीपटू पुरस्कार विजेते – 

2004 – राहुल द्रविड

2005 – जॅक कॅलिस

2006 – रिकी पाँटिंग

2007 – मोहम्मद युसुफ

2008 – डेल स्टेन

2009 – गौतम गंभीर

2010 – विरेंद्र सेहवाग

2011 – ऍलिस्टर कूक

2012 – कुमार संगकारा

2013 – मायकल क्लार्क

2014 – मिशेल जॉन्सन

2015 – स्टिव्ह स्मिथ

2016 – आर अश्विन

2017 – स्टिव्ह स्मिथ

2018 – विराट कोहली

2019 – पॅट कमिन्स 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---