भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या विश्वचषकाची तयारी करतो आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषका (ICC women cricket world cup) ची सुरुवात ४ मार्चपासून होणार आहे. तर भारतीय संघ ६ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. तत्पूर्वी भारतीय संघ वार्म अप सामने (World Cup Warm Up Matches) खेळून विश्वचषकासाठी सज्ज होतो आहे. रविवारी (२७ फेब्रुवारी) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDW vs SAW) यांच्यात वार्म अप सामना झाला. या सामन्यादरम्यान हृदयाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. भारताची अनुभवी फलंदाज स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) ही या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वार्म अप सामन्यादरम्यान स्म्रीतीच्या डोक्याला जोरदार बाउंसर (Smriti Mandhana Hit Bouncer On Head) लागला होता. ज्यानंतर तिने त्वरित मैदान सोडले होते.
हेही वाचा- ऑसी क्रिकेटरने स्म्रीती मंधनाचा बाउंड्री लाईनजवळ डाईव्ह मारत पकडला अद्भुत झेल, व्हिडिओ व्हायरल
स्म्रीती सामन्याच्या सुरुवातीलाच यस्तिका भाटियासोबत सलामीला फलंदाजीसाठी आली होती. यावेळी १२ धावांवर फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या शबनीम इस्माइलचा बाउंसर जोराने तिच्या डोक्याला लागला. बाउंसर लागल्यानंतर संघाच्या डॉक्टरांनी येऊन स्म्रीतीची तपासणी केली आणि तपासणीनंतर त्यांनी तिला फलंदाजी सुरू ठेवण्यासाठी फिट घोषित केले. परंतु डॉक्टरांसोबतच्या अजून एका सल्लामसलतीनंतर ती रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली.
चेंडू जोराने डोक्यावर आदळल्यामुळे स्म्रीती पूर्णपणे हादरली होती. भारतीय संघाच्या मेडिकल स्टाफनुसार, तिच्यात आघाताची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. तरीही खबरदारी म्हणून या भारतीय सलामी फलंदाजाने मैदान सोडले होते.
दरम्यान भारतीय संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, सलामीवीर यस्तिका भाटियाने अर्धशतकी खेळी केली. तिने ७८ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. तर हरमनप्रीत कौरने या सामन्यात शतक झळकावले. तिने ११४ चेंडूंमध्ये ११ चौकारांच्या मदतीने १०३ धावा जोडल्या. तिच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २४५ धावांचे मोठे आव्हान दिले.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २४२ धावांवरच गारद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर वॉल्वार्ड्तने ८३ धावा आणि कर्णधार लूसने ८६ धावा केल्या. परंतु राजेश्वरी गायकवाडने ४ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला २४२ धावांवरच रोखले आणि भारतीय संघाने २ धावांनी हा सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: भारताने मॅच जिंकली अन् बिनुराच्या कॅचने मनं! पाहा कसा घेतला सॅमसनचा एकहाती झेल
मायदेशात विजय मिळवण्यात कर्णधार रोहित ‘नंबर वन’! ‘इतक्या’ विजयांसह मॉर्गन-विलियम्सनला टाकले मागे






