न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी) महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup 2022) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सहावा सामना मंगळवारी (०८ मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (AUS vs PAK) संघात झाला. बे ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ६ बाद १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ३५ व्या षटकातच त्यांचे आव्हान पूर्ण केले आणि ७ विकेट्सने हा सामना खिशात घातला. या विजयासह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणातालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर पाकिस्तानचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव (Pakistan Women Consecutive Second Defeat) होता.
पाकिस्तानी कर्णधाराची एकाकी झुंज
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मरूफ (Bismah Maroof) हिने सर्वाधिक धावा केल्या. सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर मरूफ तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. तिने एकाकी झुंज देत डावाखेर नाबाद ७८ धावा केल्या. १२२ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने तिने ही खेळी केली. तिच्याव्यतिरिक्त आलिया रियाजने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. इतर फलंदाजांना साध्या २० धावाही करता आल्या नाहीत.
या डावात ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंग हिने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर मेगन शट, एलिसा पेरी, अमांडा वेलिंग्टन आणि निकोला कॅरी यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
Two in two for Meg Lanning’s side as Australia seal a seven-wicket win over Pakistan 👏#CWC22 pic.twitter.com/OM0SI0G5IQ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022
एलिसा हिलीचे अर्धशतक पडले भारी
पाकिस्तानच्या १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिली (Alyssa Healy) हिने सर्वाधिक ७२ धावांची तुफानी खेळी खेळली. तिने केवळ ७९ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. तसेच कर्णधार मेग लॅनिंग हिने ३५ धावा, सलामीवीर रिचेल हायनेस हिने ३४ धावा, एलिसा पेरीने नाबाद २६ धावा आणि बेथ मूनीने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर केवळ ३४.४ षटकात ३ विकेट्सच्या नुकसानावर पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
Alyssa Healy's fifty and Alana King's sizzling spell helped Australia make it two victories in two at #CWC22 👏 #AUSvPAK report 👇 https://t.co/pB7LY8jHJG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022
पाकिस्तानकडून ओमाइमा सोहेल (२ विकेट्स) आणि नाशरा संधू (१ विकेट) यांनाच विकेट घेण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या-
दीडशेपेक्षा जास्त धावा कुटल्यानंतर त्याच कसोटीत ८-९ विकेट्सही चटकावणारे अष्टपैलू, जडेजाचाही समावेश
Video: ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यावर धवन-चहलची धमाल, एनसीएमधील कर्मचाऱ्यांबरोबरही मस्ती
‘चाहर फॅमिली’त लवकरच वाजणार सनई चौघडे, ‘या’ तारखेला राहुल प्रेयसीसंगे बांधणार लग्नगाठ