नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला होता. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि रौप्य पदक पटकावले. भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग या संपूर्ण स्पर्धेदरम्यान तिच्या जबरदस्त प्रदर्शनासाठी चर्चेत राहिली. आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रिमवारीत रेणुका सिंगला कॉमनवेल्थ गेम्समधील प्रदर्शनाचा चांगलाच फायदा झाला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत रेणुका सिंग (Renuka Singh) हिने मोठी झेप घेतली आहे. महिलांच्या टी-२० क्रमवारीत रेणुकाला १० स्थानांचा फायदा झाला आहे. आता गोलंदाजांच्या यादीत ती १८ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण ११ विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त भारतीय संघाची जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodriques) हिने फलंदाजीत महत्वपूर्ण योगदान दिले. जेमिमा टी-२० फलंदाजांच्या यादीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये कायम आहे. स्म्रीती मंधाना मात्र दोन स्थानांनी खाली घसरली आणि आता चौथ्या क्रमांकावर आहे. शेफाली वर्णा एका स्थानाने खाली घसरली असून सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, भारतीय संघाला कॉमनवेल्थ गेम्सच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मात मिळाली. भारतीय संघ १९.३ षटकांमध्ये १५२ धावा करून सर्वबाद झाला होता. शेवटच्या षटकात विजयासाठी भारताला ११ धावांची आवश्यकता होती, पण संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ धावांनी नावावर केला. कर्णधर हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६५ धावांचे योगदान दिले, तर जेमिमाने ३३ धावांची खेली केली होती. या दोघींव्यतिर्किती दुसरी एकही फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकली नाही.
ऑस्ट्रेलियासाठी एश्ले गार्डनर जबरदस्त गोलंदाजी केली. तिने टाकलेल्या एकाच षटकात पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौर यांना बाद केले, जो भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. गार्डनरने एकूण तीन आणि मेगन सटने दोन विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. असे असले तरी, कॉमनवेल्थ गेम्समध्ये हे भारतीय महिला संघाचे पहिलेच पदक असल्यामुळे त्याचे महत्व अधिक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जेव्हा बलाढ्य इंग्लंडविरुद्ध तळपली होती जम्बोची बॅट, कसोटीत केला होता अजब कारनामा
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३ वेळा ‘एवढ्या’ कमी धावसंख्येत रोखलंय, पाहा रेकॉर्ड
‘शिखर एकाच फॉरमॅटचा खेळाडू आहे का?’, स्वत: धवनने दिले दिलखुलास उत्तर