मंगळवारी (१५ फेब्रुवारी) सुधारित आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारी (ICC ODI Women Rankings) जाहीर करण्यात आली, भारतीय महिला कर्णधार मिताली राज (Mithali Raj) या एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. परंतु महिला संघाची उत्कृष्ट फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिला मात्र या क्रमवारीत मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रदर्शनाच्या जोरावर न्यूझीलंडची एमी शेटरथवेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघात सध्या पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत ६२ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात मिताली राजने ५९ धावा केल्या होत्या, तर न्यूझीलंडसाठी एमीने ६३ धावांची महत्वाची खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर एमीला १३ गुणांचा फायदा झाला आणि तिने तिसरे स्थान गाठले.
ऑस्ट्रेलियाची एलिस हीली ७४९ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावरील मितालीकडे ७४४ गुण आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या एमीकडे ७३० गुण आहेत. भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या बेट्सने कारकिर्दीतील ११ वे शतक केले होते आणि याच प्रदर्शनाच्या जोरावर ती पाच स्थानांच्या फायद्यासह १७ व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंविरुद्धची ऍशेस मालिका जिंकली आहे. मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी अर्धशतकी खेळी केलेली टॅमी ब्यूमोंट आणि मेग लेनिंग प्रत्येकी तीन स्थनांच्या फायद्यासह अनुक्रमे चार आणि पाचव्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत.
एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची सोफी एकलेस्टोन एका स्थानाच्या फायद्यासह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात १८ धावा देऊन एक विकेट घेतली होती. सोफीकडे एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीत एकाच वेळी पहिल्या क्रमांवार पोहोचण्याची संधी आहे.
एलिस पेरी तिच्या प्रदर्शनाच्या जोरावर क्रमवारीत तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तिने अष्टपैलूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील नॅट स्किवरवर ८७ गुणांनी आघाडी घेतली आणि पहिला क्रमांक गाठला आहे. न्यूझीलंडची लिया ताहुहु चार स्थानांच्या फायद्यासह १३ व्या क्रमांकावर, तर भारताचीय राजेश्वरी गायकवाड ५ स्थानांच्या फायद्यासह १६ व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या –
पिंक पँथर्सचा यू मुंबावर ‘मोठा’ विजय, गुणतालिकेत सहाव्या स्थानी घेतली उडी
‘तो चांगेल प्रदर्शन करेल, पण…’, पंतने सलामीला फलंदाजी करण्याबद्दल प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया
आगामी आयपीएलसाठी सनरायझर्सचा मोठा ‘गेमप्लॅन’! ‘हा’ अष्टपैलू उतरणार सलामीला





