आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) (ICC) नुकताच पुरुषांची आयसीसी टी२० टीम ऑफ इयर आणि वनडे टीम ऑफ द इयरची घोषणा केली आहे. या दोन्ही संघांचे कर्णधारपद बाबर आजमकडे (Babar Azam) सोपवण्यात आले आहे. तर या दोन्ही संघांमध्ये भारतीय पुरुष संघातील एकाही खेळाडूला स्थान देण्यात आले नाहीये. त्यामुळे भारतीय संघाचे चाहते भलतेच नाराज झाले होते. परंतु, आता भारतीय संघांच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
नुकताच आयसीसीने महिला क्रिकेटपटूंची ‘आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर’ची ( icc women’s odi team of the year) घोषणा केली आहे. या संघात भारतीय संघातील एक नव्हे, तर दोन भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या संघाचे कर्णधारपद इंग्लंडच्या हिथर नाईटला देण्यात आले असून, भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू झुलन गोस्वामी आणि मिताली राज यांना या संघात स्थान देण्यात आले आहे.
या संघात सलामीवीर फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाज लेजेल ली आणि ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलीसा हेलीला स्थान देण्यात आले आहे, तर इंग्लंडची विस्फोटक फलंदाज टॅमी ब्यूमॉन्टची तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच भारतीय संघाची दिग्गज फलंदाज मिताली राजची चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
तसेच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी इंग्लंडची कर्णधार हिथर नाईटची निवड करण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद देखील हिथर नाईटला देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मेरिजेन कॅपची सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज संघाची अष्टपैलू खेळाडू हेली मॅथ्यूजला देखील या संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानची फातिमा सना फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान देईल, तर गोलंदाजीची धुरा भारताची झुलन गोस्वामी, दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माईल आणि वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद यांच्या हाती असेल.
Quality galore 🏏
The 2021 ICC Women's ODI Team of the Year is here 🙌
Details 👉 https://t.co/4JBq3JIolO pic.twitter.com/BKzSo0ET6T
— ICC (@ICC) January 20, 2022
अशी आहे महिलांची आयसीसी वनडे टीम ऑफ द इयर :
लेजली ली, एलीसा हेली (यष्टिरक्षक), टॅमी ब्यूमॉन्ट, मिताली राज, हीथर नाइट(कर्णधार), हेली मॅथ्यूज, मेरिजेन कॅप, शबनम इस्माइल, फातिमा सना, झूलन गोस्वामी, अनीसा मोहम्मद
महत्वाच्या बातम्या :
‘व्वा शिखी भाई, ऐसा रोका की कॅमेरा में भी नहीं दिख रखा’; पंतची मजेशीर बडबड स्टंप माईकमध्ये कैद
तीन वर्षे आणि तब्बल २३३ चेंडूंनंतर बुमराहला मिळाली ‘ती’ विकेट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपवला दुष्काळ
हे नक्की पाहा: