आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात शनिवारी (दि. 11 फेब्रुवारी) पार पडला. बोलँड पार्क, पार्ल येथे पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 97 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून देण्यात ऍशले गार्डनर हिने सिंहाचा वाटा उचलला. तिला सामन्यातील कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, स्टार अष्टपैलू एलिस पेरी हिने दिलेल्या योगदानाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.
एलिस पेरीने 5 चेंडूत कुटल्या 24 धावा
एलिस पेरी (Ellyse Perry) या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरली होती. यावेळी तिने अवघ्या 22 चेंडूंचा सामना करताना 181.82च्या स्ट्राईक रेटने एकूण 40 धावा कुटल्या. या धावा करताना तिने 2 षटकार आणि 3 चौकारांचाही पाऊस पाडला. तिच्या या खेळीमुळे संघाच्या धावसंख्येत मोलाची भर पडली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरुद्ध एलिसने 3 चौकार हे फ्रॅन जोनसच्या 14व्या षटकातून आले होते. तिने या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूवर सलग तीन चौकार मारले. त्यानंतर तिने 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक षटकार मारला. पुढे 18व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आणखी एक षटकार मारला. अशाप्रकारे तिने 24 धावा या फक्त चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवून कुटल्या.
Alyssa Healy (55), Meg Lanning (41) and Ellyse Perry (40) were all in superb touch with the bat!
Scorecard: https://t.co/FgbAdqFOfA #T20WorldCup #AUSvNZ pic.twitter.com/GSlPYZ4Ial
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 11, 2023
एका फलंदाजाला पाठवले तंबूत
दुसरीकडे, ती फक्त फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही चमकली. तिने फक्त 1 षटक टाकले. यावेळी तिने 4 धावा खर्च करत 1 विकेटही नावावर केली. एलिसने बर्नाडाईन बेजुइडेनहॉट हिला डार्सी ब्राऊन हिच्या हातून झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला.
An Ash Gardner 5-fa caps off a super performance to kickstart the #T20WorldCup 💥
Scorecard: https://t.co/FgbAdqFOfA #AUSvNZ pic.twitter.com/LDyNWzLz6W
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 11, 2023
ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय
पार्ल येथे पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंड महिला संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 173 धावांचा पाऊस पाडला. हे आव्हान पार करताना न्यूझीलंड संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा संपूर्ण डाव 14 षटकात अवघ्या 76 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना 97 धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला. (icc womens t20 world cup 2023 cricketer ellyse perry scored 24 runs in just 5 balls strike rate of 181)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते