---Advertisement---

विश्वचषकाच्या फायनलसाठी टीम इंडियाला या आजी-माजी खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

On: रविवार, मार्च 8, 2020 12:44 PM
---Advertisement---

मेलबर्न। आज महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे.

महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. त्यासाठी भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, केएल राहुल, झुलन गोस्वामी, शिखर धवन अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

गांगुलीने शुभेच्छा देताना ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘भारतीय महिला संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. त्यांचा देशाला अभिमान आहे.’

तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांना शुभेच्छा देताना ट्विट केले आहे की ‘समानता आणि सबलीकरणासाठी खेळ नेहमीच एक उत्प्रेरक ठरला आहे. माझ्या भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. त्यांना मेलबर्नमध्ये पाठिंबा देऊया. त्या इतिहास घडवणार आहेत.’

गोस्वामीने शुभेच्छा देताना म्हटले आहे की ‘अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. चांगला सामना खेळा.’

अन्य खेळाडूंनी भारतीय महिला संघाला दिलेल्या शुभेच्छा –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---