---Advertisement---

पोरी एक पाऊल पुढे! 2022 आयसीसी टी20 संघात स्मृतीसह तब्बल चार भारतीय

On: सोमवार, जानेवारी 23, 2023 4:53 PM
Team India
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (23 जानेवारी) आपल्या मागील वर्षीच्या आयसीसी पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी गतवर्षीचे सर्वोत्तम टी20 संघ जाहीर केले. महिलांच्या संघात भारताच्या चार खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे. या संघाचे नेतृत्व न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन करेल.

 

सोमवारी आयसीसीने गतवर्षातील सर्वोत्तम टी20 संघ घोषित केले. पुरुष संघात यावेळी विराट कोहली, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या या तीन भारतीय खेळाडूंना जागा मिळाली आहे. मात्र, महिला संघात थेट चार खेळाडूंना जागा मिळवण्यात यश आले.

भारतीय संघाची उपकर्णधार व अनुभवी सलामीवीर स्मृती मंधाना, अष्टपैलू दीप्ती शर्मा, युवा यष्टीरक्षक रिचा घोष व युवा वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर यांची या संघात वर्णी लागली आहे. या संघात स्मृतीसह सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाची अनुभवी बेथ मूनी सहभागी असेल. त्यानंतर कर्णधार म्हणून न्यूझीलंडची सोफी डिवाईन, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू तहिला मॅकग्रा व ऍश्ले गार्डनर यांचा क्रमांक लागतो. भारताच्या दिप्ती शर्मासह पाकिस्तानची अनुभवी अष्टपैलू निदा दार ही देखील संघात आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर यष्टीरक्षक म्हणून रिचा घोष संघाचा भाग बनली आहे. प्रमुख फिरकीपटू म्हणून इंग्लंडची सोफी एक्लस्टन व श्रीलंकेची इनोका रणवीरा या जबाबदारी सांभाळतील. तर, संघातील एकमेव वेगवान गोलंदाज म्हणून रेणुका सिंग ठाकूर दिसेल.

आयसीसी 2022 सर्वोत्तम टी20 संघ (महिला)-

स्मृती मंधाना, बेथ मूनी, सोफी डिवाईन (कर्णधार), तहिला मॅकग्रा, ऍश्ले गार्डनर, दिप्ती शर्मा, निदा दार, रिचा घोष (यष्टीरक्षक), सोफी एक्लस्टन, इनोका रणवीरा, रेणुका ठाकूर.

(ICC Women’s T20I Team of the Year 2022 including Smriti Mandhana Four Indian There)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी सोडा आणि बुधवारपर्यंत रांचीत पोहोचा, पृथ्वी शॉसह ‘या’ खेळाडूंना बीसीसीआयचा आदेश
“सूर्या आणि बटलर कुठेही धावा करू शकतात,” स्वतः दिग्गज गोलंदाजानेच केलं कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---