---Advertisement---

मिताली अन् कंपनीची विश्वचषक पटकावण्याची तयारी; बलाढ्य संघांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी लावली हजेरी

On: सोमवार, मार्च 14, 2022 4:25 PM
Mithali-Raj
---Advertisement---

आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Womens World Cup 2022) न्यूझीलंडमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघ या विश्वचषकात दमदार कामगिरी करत आहे. भारताचा चौथा सामना १६ मार्चला इंग्लंडविरुद्ध खेळला जाणार आहे. एकीकडे या सामन्यासाठी भारतीय संघ तयारी करत आहे, तर दुसरीकडे  मिताली राजचा (Mitali Raj) एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोमवारी (१४ मार्च) दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये मिताली आणि भारतीस संघाचे काही खेळाडू सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. यादरम्यान मिताली वेगळ्या लूकमध्ये दिसली.

मिताली आपल्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक खेळत आहे. यादरम्यान ती भारताच्या सामन्यांबरोरच इतर संघांच्या सामन्यांचा देखील आनंद घेत आहे. ती दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामना रंगीबेरंगी चष्मा आणि फ्लोरल शर्ट घालून पाहताना दिसली. हा सामना पाहायला जाण्याचे हे कारण समोर आले आहे की यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध सामना खेळायचा आहे त्यामुळे इंग्लंड संघाची ताकद आणि कमजोरी जाणून घेण्याचा हा अप्रतिम मार्ग आहे.

भारतीय संघाने या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामधील दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात अपयश आले. भारताने पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड संघांसोबत सामने खेळले आहेत. त्यांपैकी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजला भारताने मोठ्या धावसंख्येने पराभूत केले, तर यजमान संघाविरुद्ध भारत ६२ धावांनी पराभूत झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध भारताला महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. १६ मार्चला इंग्लंडविरुद्ध, तर १९ मार्चला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना पाहायला मिळेल.

महिला विश्वचषकात मितालीने नेतृत्व केलेल्या २४ सामन्यांपैकी १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर ७ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्कारावा लागला आहे. मितालीने ६ विश्वचषक खेळणारी पहिली महिला ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर २३ सामने खेळणारी ऑस्‍ट्रेलियाची बेलिंडा क्‍लार्क आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर १९ सामने खेळणारी इंग्लंडची सुसान गोटमॅन आहे. सचिन तेंडुलकर आणि जावेद मियाँदाद यानंतर ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘प्रेम केसांमध्ये आहे’, गुलाबी रंगात केस रंगवत हेटमायरनं राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांचं जिंकलं काळीज

महान भारतीय कर्णधारही बळींचा पंचक घेणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीच्या प्रेमात; म्हणाले, ‘एवढी प्रतिभा…’

जागतिक कसोटी चँपियनशीप: ‘पंचका’मुळे बुमराह बनला नंबर १, पंतचीही प्रगती; पण विराट- रोहितचं नुकसान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---