न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आयसीसी महिला विश्वचाषक स्पर्धेत मंगळवारी (२२ मार्च) स्पर्धेतील २२ वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारत आणि बांगालादेश हे दोन महिला संघ आमने सामने होते. भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. बांगलादेशची वेगवान गोलंदाज जहांआरा आलमसाठी हा सामना काही खास ठरला नाही. तीने ५२ धावा खर्च केल्या आणि फक्त एक विकेट घेऊ शकली.
जहांआरा आलम (Jahanara Alam) हिने या सामन्यात एकूण ८ षटके गोलंदाजी केली आणि यादरम्यान तब्बल ५२ धावा खर्च केल्या. भारताच्या डावाच्या शेवटच्या षटकात जहांआरा एक विकेट घेऊ शकली. एक विकेट मिळाल्यानंतर जहांआराला झालेला आनंद हा मोठा होता.
शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर भारतीय संघाची स्नेह राणा (Sneh Rana) फाइन लेगच्या वरून स्कूप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होती, पण बांगलादेशच्या रितु मोनीने जहांआराच्या गोलंदाजीवर तिचा सोपा झेल घेतला. स्नेह राणाने या सामन्यात २३ चेंडू खेळले आणि २७ धावा खर्च केल्या.
जहांआराने स्वतःची पहिली विकेट घेताच जल्लोष करायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने फ्लाइंग किस दिला आणि नंतर तोंडावर बोट ठेऊन खेळपट्टीवर दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आयसीसीने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CbZHiLCoOoo/?utm_source=ig_web_copy_link
सामन्याचा विचार केला, भारतीय संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मर्यादित ५० षटकांमध्ये ७ विकेट्स गमावल्या आणि यामध्ये २२९ धावा केल्या. यामध्ये भारताची मध्यक्रमातील फलंदाज यस्तिका भाटियाने सर्वाधिक ५० धावांचे योगदान दिले. सलामीवीर स्मृती मंधानाने ३० आणि शेफाली वर्माने ४२ धावांचे योगदान दिले. पुजा वस्त्राकर ३० आणि झूलन गोस्वामी २ धावांसह खेळपट्टीवर नाबाद राहिल्या.
महत्वाच्या बातम्या –
Photo | ‘मिशन आयपीएल’साठी विराट कोहली सज्ज, आरसीबीच्या कँपमध्ये केले आगमन
फाफ डू प्लेसिस सर्वात ‘स्वस्त’, तर ‘हा’ खेळाडू बनला आयपीएल १५मधील सर्वात महागडा कर्णधार, घ्या जाणून