विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रविवारी (19 नोव्हेंबर) भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता अंतिम सामना सुरू होईल. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 2006 चा आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तत्कालीन आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Pontting) याने तत्कालीन आयसीसी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून ट्रॉफी हिसकावून घेतली होती. शरद पवारांनाही त्यांनी तेथून जाण्यास सांगितले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या गैरवर्तनाचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे भारतीय चाहत्यांचे म्हणणे आहे. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघ नक्कीच बदला घेईल.
ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने तत्कालीन आयसीसी अध्यक्ष शरद यांच्याकडून ट्रॉफी हिसकावून घेतली होती. शरद पवारांनाही त्यांनी तेथून जाण्यास सांगितले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या गैरवर्तनाचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे भारतीय चाहत्यांचे म्हणणे आहे. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघ नक्कीच बदला घेईल.
Need a revenge for this as well. pic.twitter.com/Rwt9nqB3D6
— Raunak (@MeraHandle) November 16, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्स राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना होणार आहे.
या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया साखळी सामन्यात आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. (When Australia captain Ricky Ponting misbehaved with ICC president Sharad Pawar watch the video)
म्हत्वाच्या बातम्या
World Cup 2023 Final: ‘भारत वर्ल्डकप जिंकला, तर पुढच्या सिनेमात 11 नवे कलाकार घेईल’, वाचा कुणी दिलाय शब्द
प्रेरणादायी! जग जिंकायला निघालेल्या रोहितने शाळेच्या पुस्तकातही मिळवले स्थान; तुम्हीही म्हणाल, ‘भारीच ना’