भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. भारतीय क्रिकेटप्रेमी सध्या एकाच गोष्टीची प्रार्थना करत आहेत की, भारताने तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकावा. अशात देशभरातून वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना केल्या जात आहेत. अशातच एका प्रसिद्ध लेखकाने वचन दिले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लेखक राज शांडिल्य (Raaj Shaandilyaa) यांनी चाहत्यांना मोठे वचन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकला, तर ते त्यांच्या पुढील चित्रपटात 11 नवीन कलाकारांना संधी देतील. शांडिल्य यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “भारत जर क्रिकेट विश्वचषक जिंकला, तर माझ्या पुढच्या सिनेमात कमीत कमी 11 नवीन कलाकारांना घेईल. वचन देतोय. मला माहितीये की, भारतच विश्वचषक जिंकेल.”
भारत अगर क्रिकेट वर्ल्ड कप जीतता है तो अपनी अगली फ़िल्म में कम से कम 11 नए कलाकारों को लूंगा…वादा है…
और मैं जानता हूँ कि भारत ही वर्ल्ड कप जीतेगा…#WorldcupFinal INDIAvAUSTRALIA— Raaj Shaandilyaa (@writerraj) November 16, 2023
बॉलिवूडमध्ये आपल्या लेखणीने छाप सोडणारे राज शांडिल्य एक यशस्वी दिग्दर्शकही बनले आहेत. राज शांडिल्य यांनी अलीकडेच ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाच्या यशानंतर आता राज आणखी एका प्रोजेक्टसह प्रेक्षकांना खुशखबर देण्यासाठी तयार आहेत. यावेळी ते ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ’ नावाचा सिनेमा बनवणार आहेत. या सिनेमाचे एक पोस्टरही जारी करण्यात आले आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असतील. अशात प्रत्येक चाहता हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, भारतीय संघ विश्वचषक जिंकला, तर ते कोणत्या नवीन 11 कलाकारांना आपल्या सिनेमात घेतील.
विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताची कामगिरी
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ विश्वचषक 2023 (Team India World Cup 2023) स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. आधी भारताने साखळी फेरीतील 9 सामने जिंकले. त्यानंतर पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले. अशाप्रकारे भारताने 10 सामने जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. आता अंतिम सामन्यातही भारतीय संघ उत्कृष्ट प्रदर्शन करत विश्वचषक 2023चा किताब जिंकण्याचा प्रयत्न करेल. (if india wins the world cup i will pick 11 new actors in my upcoming film said this writer ahead of odi world cup 2023 final ind vs aus)
हेही वाचा-
प्रेरणादायी! जग जिंकायला निघालेल्या रोहितने शाळेच्या पुस्तकातही मिळवले स्थान; तुम्हीही म्हणाल, ‘भारीच ना’
CWC 23 Final: क्या बात! अतिशय थाटामाटात झाले अहमदाबादमध्ये टीम इंडियाचे स्वागत, पाहा व्हिडिओ