दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत आपलं नाणं चांगलंच खणकवलं आहे. आधी इंग्लंड आणि आता स्पर्धेच्या 22व्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत अफगाणिस्तानने दुसरा मोठा उलटफेर केला आहे. यामधून त्यांनी जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. अफगाणिस्ताने सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे, या विजयामुळे अफगाणिस्तानने विक्रमांचे मनोरे रचले आहेत.
एका विजयात अफगाणिस्ताचे चार विक्रम
1. वनडेतील पहिला विजय
अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने पाकिस्तानला पराभूत करताच त्यांच्या नावावर 4 विक्रम नोंदवले गेले. त्यातील पहिला म्हणजे, वनडेतील पाकिस्तानविरुद्धचा पहिला विजय होय. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 7 वनडे सामन्यात पाकिस्तान संघ अजिंक्य राहिला होता. मात्र, चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअम येथे अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत विजयाचं खातं उघडलं.
2. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठा धावांचा पाठला
अफगाणिस्तान संघाने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. अफगाणिस्तानपूर्वी विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध 274 धावा करत विजय मिळवला होता. भारताचा हा विक्रम अफगाणिस्तानने मोडत इतिहास रचला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या 283 धावांचे आव्हान 286 धावा करत मोडून टाकले.
3. वनडेत सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान विजय
अफगाणिस्तानने पाकिस्तानकडून मिळालेल्या 283 धावांच्या आव्हानाचा 49 षटकात यशस्वीरीत्या पाठलाग करत ऐतिहासिक विजय साकारला. वनडे क्रिकेटमध्ये हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करतानाचा यशस्वी विजय आहे. यापूर्वी संघाने यूएईविरुद्ध सन 2014मध्ये 274 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
4. विश्वचषकातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या
अफगाणिस्तान संघाची 50 षटकांच्या विश्वचषकातील ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्याही आहे. विश्वचषकात अफगाणिस्तानने आपली सर्वात मोठी धावसंख्या 2019मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. त्या सामन्यात संघाने 288 धावा केल्या होत्या. (icc world cup 2023 afghanistan created many big records after defeating pakistan for first time in odi history know here)
हेही वाचा-
ऐतिहासिक विजयासह अफगाणी सेनेची Points Tableमध्ये ‘या’ स्थानी गरुडझेप, Englandला वाटत असेल स्वत:ची लाज
‘मी स्पर्धेच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो…’, पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यानंतर अफगाणी कर्णधाराचे मोठे विधान