ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याला विश्वचषक 2023 स्पर्धेत लय सापडली आहे. मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 40 चेंडूत धमाकेदार शतक करत विश्वचषकातील वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने विक्रमांचा पाऊस पाडला. या सामन्यात त्याने 24 चेंडूत 41 धावा केल्या. मात्र, या खेळीतही अनेक विक्रम घडले. त्यापैकी एक म्हणजे विश्वचषक 2023मधील सर्वात लांब षटकार होय.
मोडला भारतीयाचा विक्रम
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचा लांब षटकाराचा विक्रम मोडीत काढला आहे. एवढंच नाही, तर मॅक्सवेल आता विश्वचषक (World Cup) स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा पाचवा फलंदाज बनला आहे. त्याने या खेळीत 2 षटकार मारले आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यालाही पछाडले.
मॅक्सवेलचा लांब षटकार
मॅक्सवेलने या डावात 104 मीटरचा गगनचुंबी षटकार मारला. हा षटकार विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरला. मॅक्सवेलने मारलेला चेंडू थेट धरमशाला स्टेडिअमच्या छतावर जाऊन पडला. यादरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/Cy727JLPICO/?utm_source=ig_embed&ig_rid=8ad93dc0-e07b-41c0-9807-719f57011ea0
यापूर्वी भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या नावे हा विक्रम होता. त्याने 101 मीटर लांबीचा षटकार मारला होता. या यादीत हे दोघेच असे फलंदाज आहेत, ज्यांनी 100 हून अधिक मीटर लांबीचा षटकार मारला. इतर फलंदाजांना 98 किंवा 95 मीटर लांबीपर्यंतच षटकार मारता आला आहे. अव्वल पाच खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी डेविड वॉर्नर (98 मीटर), डॅरिल मिचेल (98 मीटर) आणि डेविड मिलर (95 मीटर) यांचा समावेश आहे.
विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
याव्यतिरिक्त विश्वचषक सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांचा विचार केला, तर त्यात अव्वलस्थानी ख्रिस गेल आहे. त्याने 49 षटकार मारले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने 40 षटकार, तिसऱ्या स्थानावरील एबी डिविलियर्सने 37 षटकार, चौथ्या स्थानी असलेल्या डेविड वॉर्नरने 36, तर मॅक्सवेल पाचव्या स्थानी असून त्याने 33 षटकार मारले आहेत. तसेच, सहाव्या स्थानी रिकी पाँटिंग असून त्याने 31 षटकार मारले आहेत. (icc world cup 2023 aus vs nz glenn maxwell hits longest six surpassed shreyas iyer makes series of records read)
विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
49- ख्रिस गेल
40- रोहित शर्मा
37- एबी डिविलियर्स
36- डेविड वॉर्नर
33- ग्लेन मॅक्सवेल*
31- रिकी पाँटिंग
हेही वाचा-
ट्रेविस हेडने रचला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला चौथा खेळाडू
सलामीवीरांच्या तडाख्यामुळे ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या! वाढला न्यूझीलंडच्या फलंदाजांवरील दबाव