वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना कोणता असेल, तर तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान होय. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल या सामन्यातून बाहेर पडू शकतो. यामुळे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, शुबमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यू झाला होता, जो अद्याप पूर्णपणे बरा झाला नाहीये. त्यामुळे त्याचे विश्वचषकात खेळणे खूपच कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या पहिल्या सामन्यातूनही बाहेर पडला होता. त्याच्या जागी इशान किशन याला खेळवले गेले, पण तो शून्यावर तंबूत परतला होता. गिलला चेन्नईत येताच जोरात ताप आला होता आणि त्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याची पुष्टी झाली होती. तो फक्त ऑस्ट्रेलियाच नाही, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर पडला.
शुबमन गिल हेल्थ अपडेट
हाती आलेल्या माहितीनुसार, शुबमन गिल भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामनाही खेळू शकणार नाहीये. वृत्तांनुसार, त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचारही झाले. त्यानंतर त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. तो भारत-पाकिस्तान सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले, तर पुन्हा एकदा हा भारतासाठी मोठा धक्का असेल.
Shubman Gill is showing constant improvement….!!!
– Gill has been in the hotel from October 9th after spending a night for observation in Hospital on October 8th. [News18] pic.twitter.com/3dBiGI3TFs
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2023
गिल एवढा महत्त्वाचा का?
खरं तर, शुबमनला अहमदाबादच्या खेळपट्टीवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. आयपीएलदरम्यान अनेक सामन्यात त्याने जबरदस्त खेळी साकारली होती. हे त्याचे होम ग्राऊंड असल्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाऊस पाडू शकत होता. आता तो बाहेर पडल्यामुळे संघाच्या चिंता वाढल्या आहेत. अशात त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (icc world cup 2023 cricketer shubman gill likely to miss pakistan match)
हेही वाचा-
CWC 23 सामना सातवा: बांगलादेशने जिंकला टॉस, धरमशालेत बटलरसेना करणार बॅटिंग; दोन्ही संघात महत्त्वाचा बदल
IND vs AFG: विश्वचषकातील दुसऱ्या युद्धासाठी टीम इंडिया सज्ज, अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली करणार काबीज!
CWC 2023: पाकिस्तान-श्रीलंकेत हैद्राबादमध्ये रंगणार ‘एशियन वॉर’, दोन्ही संघ विजयासाठी आतुर