क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राशिद लतीफ याने खळबळजनक दावा केला आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जका अश्रफ आणि कर्णधार बाबर आझम यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. चला तर, लतीफ नक्की काय म्हणाला आहे, जाणून घेऊयात…
राशिद लतीफ (Rashid Latif) याने म्हटले की, पीसीबी अध्यक्ष जका अश्रफ (Zaka Ashraf) यांनी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या फोन आणि मेसेजला उत्तर देणे बंद केले आहे. याव्यतिरिक्त त्याने असेही म्हटले की, पाकिस्तानी खेळाडूंना पाच महिन्यांपासून पगारही मिळाला नाहीये.
खरं तर, पाकिस्तान संघ (Pakistan Team) विश्वचषक 2023 (World Cup 2023) सातत्याने निराशाजनक प्रदर्शन करत आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर त्यांच्याच देशात टीका केली जात आहे. अशात संघाचा माजी कर्णधार लतीफने दावा करत सांगितले की, पाकिस्तानी खेळाडूंना पाच महिन्यांचा पगारही मिळाला नाहीये. पाकिस्तानच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर बोलताना, लतीफने हे विधान केले आहे.
लतीफचा मोठा खुलासा
लतीफ म्हणाला, “मला या तथ्याविषयी माहिती आहे की, जेव्हा बाबरने भारतातून फोन आणि मेसेज केले, तेव्हा त्याला अध्यक्षाकडून कोणतेही उत्तर आले नाही. खेळाडूंना पगार मिळाला नाहीये. अध्यक्ष कर्णधाराला उत्तर देत नाहीये आणि या परिस्थितीत आम्ही संघाकडून काय आशा ठेवतो?”
केंद्रीय कराराचा घेतला जातोय आढावा
लतीफने आरोप लावला की, केंद्रीय करारानुसार, खेळाडूंना कमीत कमी 4 ते 5 महिन्यांचा पगार मिळाला नाहीये. लतीफने असाही दावा केला की, बोर्डाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेळाडूंना सांगितले आहे की, विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी ज्या केंद्रीय करारावर स्वाक्षरी केली होती, त्याचा आढावा घेतला जातोय. यावेळी लतीफने त्याच्या दाव्यांविषयी कोणताही पुरावा दिला नाहीये.
पाकिस्तानचा पराभव
पाकिस्तान संघाने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. संघाने पहिले दोन सामने जिंकले होते. मात्र, त्यानंतर पुढील चारही सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशाही कमी झाल्या आहेत. (icc world cup 2023 rashid latif said pcb chief zaka ashraf stopped taking babar azam calls pak vs sa read here)
हेही वाचा-
‘हार्दिक येईपर्यंत आमचा त्याच्यावरच विश्वास…’, KL Rahulचे टीम इंडियातील ‘या’ खेळाडूविषयी मोठे भाष्य
‘हे कठीण असेल, पण आमचे ध्येय…’, बांगलादेशच्या नांग्या ठेचल्यानंतर नेदरलँड्सच्या कॅप्टनचे मोठे विधान