भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा मोठा सामना सुरू होण्याची आतुरतेने वाट पहिली जात आहे. परंतु, अनेकांना असे ही प्रश्न पडले असतील की, हा सामना किती भाषांमध्ये लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे? चला तर जाणून घेऊया.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तसेच इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहायला मिळणार आहे. इतकेच नव्हे तर या सामन्यासाठी तब्बल ३४ कॅमेरे देखील लावण्यात येणार आहेत. पण स्टार स्पोर्ट्स आयपीएल सामन्यांचे मराठीत प्रक्षेपण करत असतात, यंदा मात्र अंतिम कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मराठीचा समावेश नाही.
हा एक मोठा सामना असल्याने आयसीसीने समालोचकांची यादी देखील जाहीर केली आहे. यामध्ये सुनील गावसकर, कुमार संगकारा, नासिर हुसेन, साईमन डूल, ईशा गुहा, इयान बिशप, मायकल एथरटन, क्रेग मॅकमिलन आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत देखील दिनेश कार्तिकने समालोचन केले होते.
दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवण्यासाठी समान संधी असणार आहे. कारण, भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांपासून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तर न्यूझीलंड संघाने नुकतेच इंग्लंड संघाला १-० ने त्यांच्याच घरात पराभूत करण्याची कामगिरी केली आहे.
विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत विजय मिळवणाऱ्या संघाला ११.७२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. तर उपविजयी संघाला ५.८५ कोटी रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा १५ सदस्यांचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! पावसात ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारताना खेळाडूचे जमिनीवर लोटांगण, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा
अखेर अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी केला विवियन रिचर्ड्स यांच्याबरोबरच्या प्रेमकथेचा खराखुरा उलगडा