---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे न्यूझीलंडची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक, दुसऱ्या स्थानासाठी ‘या’ संघांमध्ये चुरस

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 9:46 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी वाईट बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाला आहे. मात्र त्याचवेळी न्यूझीलंडने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

ऑस्ट्रेलियाने मंगळवारी आपला दक्षिण आफ्रिकेचा नियोजित दौरा रद्द केला. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाची सद्य परिस्थिती बघता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच कारणाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत महत्वाचे बदल झाले.

आता गुणतालिकेत भारतीय संघ पाच मालिकांनंतर १३ सामन्यातील ७१.७ अशा विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड यानंतर कोणतीही मालिका खेळणार नाही आहे. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याकडे चार मालिकेतील १४ सामन्यात ६९.२ अशी विजयाची टक्केवारी आहे. मात्र ते आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पुढची एकही मालिका खेळणार नाहीत. त्यामुळे चौथ्या स्थानावरील इंग्लंड आणि अव्वल क्रमांकावरील भारत यांच्यात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आगामी मालिकेत चुरस रंगेल.

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, स्टार गोलंदाज अशोक दिंडाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

दोन कंपन्यांचा मालक बनविणार पहिल्या कसोटीची खेळपट्टी

भारताविरुद्ध शंभरावा कसोटी सामना खेळत या दिग्गजांनी गाजवले मैदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---