---Advertisement---

‘अश्विन श्रीलंकेत जन्मला असता तर…’, आइसलंड क्रिकेटचे गमतीशीर ट्वीट सोशल मीडियावर ठरतेय चर्चेचा विषय

On: शनिवार, डिसेंबर 25, 2021 5:58 PM
R-Ashwin
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आइसलंड क्रिकेट (iceland cricket) संघाचे नाव खूपच कमी ऐकायला मिळते. या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त खास कामगिरी केलेली नाही. परंतु आइसलंड क्रिकेट सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरते. आइसलंड क्रिकेट असोसिएशन द्वारे संचालित आइसलंड क्रिकेट हे ट्वीटर हँडल तांच्या मजेदार ट्वीटसाठी प्रसिद्ध आहे. आता त्यांनी भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) विषयी एक मजेदार ट्वीट केले आहे.

आइसलंड क्रिकेटचे ट्वीटर हँडल त्यांच्या गमतीशीर ट्वीट्ससाठी नेहमीच चर्चेत असते. चाहत्यांनी मोठ्या संखेत त्यांना फॉलो केले आहे. शक्रवारी (२४ डिसेंबर) त्यांनी रविचंद्रन अश्विन आणि दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्याविषयी एक खास ट्वीट केले. हे ट्वीट चाहत्यांना देखील खूप आवडल्याचे पाहायला मिळत आहे.

आइसलंड क्रिकेटने ट्वीटमध्ये लिहिले की, “जीवनात प्रसंग आणि नशीब हेच सर्वकाही आहे. जर रविचंद्रन अश्विन श्रीलंकामध्ये जन्मला असता, तर त्याने कदाचीत मुरलीधरन एवढ्या विकेट्सने त्याच्या कारकिर्दीचा शेवट केला असता. जर डॉन ब्रॅडमन आइसलंडमध्ये जन्मले असते, तर त्यांची एकही आंतरराष्ट्रीय धाव नसती आणि एक लहान माशेमार असते. हेच आयुष्य आहे.”

हेही वाचा- क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’

आइसलंड क्रिकेटच्या या ट्वीटवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शुक्रवारी या ट्वीटला अनेकांकडून रिट्वीट देखील करण्यात आले. दरम्यान, आइसलंड क्रिकेटने यापूर्वी अनेक असे ट्वीट केले आहेत, जे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. २०१९ आयसीसी विश्वचषकात अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. त्यावेळी आइसलंड क्रिकेटने त्याला थेट आइलंडमध्ये स्थायिक होण्याचा प्रस्ताव दिला होता.

अंबाती रायडूविषयी ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले होते की, “मयंकने ७२.३३ च्या सरासरीने तीन प्रोफेशनल विकेट्स घेतल्या तर अंबाती रायडू आता त्याचा ३ डी चष्मा काढू शकतो. आम्ही त्याच्यासाठी तयार केलेले दस्तावेज वाचण्यासाठी त्याला फक्त सामान्य चष्मा लागेल. ये आणि आमच्यासोबत सामील हो अंबाती. आम्हाला अंबातीच्या गोष्टी आवडतात.”

महत्वाच्या बातम्या –

मालिका विजयासाठी कांगारू सज्ज! अशी आहे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन

‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही

राजकारणाच्या पिचवर उतरणार का हरभजन? स्वतः दिले उत्तर; म्हणाला…

व्हिडिओ पाहा –

विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain|क्रिकेटर कमी राजकारणी जास्त असलेला Vizi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---