भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिका नावावर केली आहे. परंतु या मालिकांमध्ये विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. विराट मागच्या मोठ्या काळापासून स्वस्तात बाद होताना दिसत आहे. अडीच वर्षांपेक्षा जास्ता काळापासून विराटने एकही आंतरराष्ट्रीय शतक केले नाही. अशात क्रिकेटविश्वात माजी दिग्गज विराटने पुन्हा फॉर्म मिळवावा यासाठी नेहमीच वेगवेगळे सल्ले देत असताता. पण भारताच माजी कर्णधार सुनील गावसरांच्या मते त्यांना फक्त २० मिनिट मिळाले, तर ते विराटला फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी मदत करू शकतात.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विराटच्या खराब फॉर्मविषयी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते विराटसोबत २० मिनिटांची चर्चा होणे गरजेचे आहे, जेणेकरून ते विराटला समजावू शकतील की, तो कुठे चुकत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) विषयी बोलताना गावस्कर म्हणाले की, “जर माझ्याकडे त्याच्याशी चर्चा करण्यासाठी २० मिनिट असते, तर मी त्याला सांगू शकलो असतो की, काय केले पाहिजे. ही गोष्ट त्याची मदत करू शकते. मी असे म्हणत नाहीये की, यामुळे त्याला मदत होईलच, पण ही गोष्ट विशेषतः ऑफ स्टंप लाईनविषयी असू शकते.”
“सलामीवीर असल्यामुळे त्या लाईनमुळे अडचणी आल्या तर काही गोष्टी अशा असतात, ज्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. जर मला त्याच्यासोबत २० मिनिट मिळाले, तर मी त्याला हे सांगू शकेल. मला वाटते की, तो कधी पुनरागमन करतो, याची आपल्याला आता वाट पाहावी लागेल. त्याला चुका करण्याचा अधिकार आहे. त्याचे विक्रम पाहिले तर, त्याने ७० आंतरराष्ट्रीय शतके ठोकले आहेत. सर्व प्रकारात आणि परिस्थितीत त्याने धावा केल्या आहेत,” असेही गावसकर पुढे बोलताना म्हणाले.
गावसरांनी पुढे असाही उल्लेख केला की, चाहत्यांकडून खेळाडूंना समर्थन मिळाले पाहिजे. विराट कोहलीसोबत देखील आपण धैर्य बाळगण्याची गरज असल्याचे गावसकरांना वाटते. विराटने या इंग्लंड दौऱ्यात केलेल्या प्रदर्शनाचा जर विचार केला, तर एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमध्ये त्याने अवघ्या ३३ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी टी-२० मालिकेत त्याला फक्त १२ धावा करता आल्या होत्या. तसेच वर्मिंघममध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील दोन डावांमध्ये त्याच्या बॅटमधून ३१ धावा निघाल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेत सुरू होतीये मिनी आयपीएल! भारताच्या ‘या’ सहा संघानी लावली बोली
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला
टीम इंडियाचे अभिनंदन करणारे बीसीसीआय अध्यक्ष गांगुलींचे ट्वीट होतयं व्हायरल, काय असेल कारण?